मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने

152 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यरोबोअमने जी पापे केली व इस्राएलला सुद्धा करण्यास भाग पाडले यामुळे याहवेह त्यांचा त्याग करतील.”

  2. आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले.

  3. इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली.

  4. त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले.

  5. ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली.

  6. याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली.

  7. परंतु यहूदीयानेही याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी इस्राएलींनी सुरू केलेल्या पद्धतींचे पालन केले.

  8. तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!”

  9. जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही.

  10. त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते.

  11. यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते: “तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही.

  12. परंतु तुम्ही इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि अहाबाच्या घराण्याने जसे केले त्याप्रमाणे तुम्ही यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले आहे. तुम्ही स्वतःच्या भावांची, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची, तुमच्यापेक्षा चांगले असलेल्या पुरुषांचीही हत्या केली आहे.

  13. “पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!

  14. निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.

  15. बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.

  16. असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली आणि त्यांचा आक्रोश ऐकला;

  17. त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.

  18. त्यांना बंदिवासात नेलेल्या शत्रूंच्या मनात त्यांच्याकरिता कृपा उत्पन्न केली.

  19. माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे ओघ वाहतात, कारण तुमच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे.

  20. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते. पण पाप कोणत्याही लोकास निंदनीय ठरविते.

  21. जर राजा लबाड गोष्टी ऐकत असेल, तर त्याचे सर्व अधिकारी दुष्ट होतील.

  22. हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! कारण याहवेह असे म्हणाले: “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे.

  23. बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”

  24. हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे.

  25. तुम्हाला आणखी मार का दिला जावा? तुम्ही विद्रोह का करीत राहावे? तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे.