मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने: Often caused by prosperity

5 वचने · 34 पैलू

Often caused by prosperity बद्दल वचने

  1. लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला; खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला. उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला, आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.

  2. “पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!

  3. “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.

  4. “ ‘तुझी बहीण सदोम हिचे अपराध हे होते: ती व तिच्या मुली अहंकारी, खादाड व इतरांची काळजी न करणार्‍या अशा होत्या; त्यांनी गरीब व गरजवंतांना मदत केली नाही.

  5. व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने तू आपले धन वाढविलेस, आणि तुझ्या संपत्तीमुळे तुझे हृदय गर्विष्ठ झाले आहे.