मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने: Punishment for, averted on repentance

9 वचने · 34 पैलू

Punishment for, averted on repentance बद्दल वचने

  1. परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.”

  2. नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.

  3. तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!”

  4. जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही.

  5. बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.

  6. असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली आणि त्यांचा आक्रोश ऐकला;

  7. त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.

  8. त्यांना बंदिवासात नेलेल्या शत्रूंच्या मनात त्यांच्याकरिता कृपा उत्पन्न केली.

  9. जेव्हा परमेश्वराने पाहिले, त्यांनी काय केले आणि आपल्या दुष्ट मार्गांपासून कसे फिरले आहेत, तेव्हा त्यांनी आपली इच्छा बदलली आणि त्यांनी ठरविलेला नाश त्यांच्यावर आणला नाही.