मुख्य मजकुरावर जा

Music बद्दल बायबलमधील वचने

324 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)

  2. परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.” हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला

  3. तिने बघितले की रीतीनुसार राजा खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक आनंद करीत कर्णे वाजवित होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी रे, फितुरी!”

  4. कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:

  5. यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.

  6. दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे, जो त्या नावाने संबोधित केला जातो, सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत, तो आणण्यासाठी निघाले.

  7. त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते.

  8. दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते.

  9. दावीदाने लेवी पुढार्‍यांना गायकवर्ग व वाद्यवृंद तयार ठेवण्यास सांगितले. या वाद्यवृंदानेः सतार, वीणा व झांजा उच्चस्वराने आणि हर्षाने वाजविल्या.

  10. लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले.

  11. पुढे नमूद केलेल्या कुटुंबातील लोक त्यांचे सहायक म्हणून नेमले: जखर्‍याह, बेन, यजिएल, शमिरामोथ, यहीएल, उन्नी, एलियाब, बेनाइयाह, मासेयाह, मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह. ओबेद-एदोम व ईयेल हे द्वारपाल होते.

  12. संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते.

  13. जखर्‍याह, अजीएल, शमिरामोथ यहीएल, उन्नी, एलियाब, मासेयाह व बेनाइयाह यांना अलामोथ या संगीत रागावर सारंगी वाजविण्यास नेमले.

  14. मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह, ओबेद-एदोम, ईयेल, व अजज्याह यांना शमीनीथ सुरावर वीणा वाजविण्यास नेमले होते.

  15. लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता.

  16. शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.

  17. दावीद, कोश वाहणारे सर्व लेवी, सर्व गायक व गायकांचा मुख्य संगीतकार कनन्याह होता, या सर्वांनी तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.

  18. अशाप्रकारे इस्राएलाच्या सर्व लोकांनी हर्षाने जयघोष करीत, रणशिंगे, कर्णे, झांजा, सतार व वीणा यांच्या मोठ्या निनादात याहवेहचा कराराचा कोश आणला.

  19. इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्‍या काही लेवी लोकांची नेमणूक केली:

  20. वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्‍याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.

  21. बेनाइयाह व यहजिएल हे याजक परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे नियमितपणे कर्णे वाजवित.

  22. त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:

  23. याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.

  24. त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा.

  25. त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो.