- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Malice बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
बळी पडलेले लोक त्याच्या प्रबळ शक्तीखाली दडपले जातात, त्याच्या प्रहारांनी चिरडले जातात.
मला पाहून ते माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,
ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.”
ते माझ्या बर्याची फेड वाईटानेच करतात. माझा जीव शोकग्रस्त झाला आहे.
ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला; नम्र होऊन मी त्यांच्यासाठी उपास केले. परंतु माझ्या प्रार्थना उत्तर न मिळताच माझ्याकडे परत आल्या.
मी असा विलाप केला जणू काय मी माझ्या मित्रासाठी किंवा भावासाठी विलाप करीत आहे. मी असा शोक केला जसा मी माझ्या आईसाठी शोक करीत आहे.
पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे. माझ्यावर आक्रमण करणारे मला माहीत नसताना एकत्र येऊन, माझी एकसारखी निंदा करतात.
ते नास्तिकाप्रमाणे माझी क्रौर्याने थट्टा करीत होते; माझ्यावर दातओठ खात होते.
जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत, त्यांना आता माझा उपहास करण्यात आनंद करू देऊ नका; निष्कारण जे माझे विरोधी झाले आहेत त्यांना डोळे मिचकाविण्याची संधी देऊ नका.
ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी चर्चा न करता, शांतीने राहणार्या निरपराध लोकांविरुद्ध कट करण्यासंबंधी चर्चा करीत असतात.
ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात, “अहाहा! अहाहा! आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.”
माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?”
जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो.
माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात.
“त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात.
रात्रंदिवस ते तटाभोवती फिरत असतात; दुष्टपणा व अनीतिमानपणा नगरात आहे.
नगरात विध्वंसक शक्ती कार्यरत आहेत; धमक्या आणि खोट्या गोष्टी कधीही त्यांचा मार्ग सोडत नाही.
दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ काढतात; माझा पाडाव कसा करावा, यासंबंधीचाच ते विचार करीत असतात.
ते एकत्र जमून कट रचतात, दबा धरतात; माझ्या पावलांचा कानोसा घेत, मला ठार करण्याच्या संधीची वाट पाहतात.
पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.
मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत. हे परमेश्वरा, उठा, माझ्या कष्टांकडे पाहा आणि मला साहाय्य करा.
संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरत हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.
ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा. त्यांच्या तोंडातील शब्द तलवारीसारखे धारदार आहेत आणि ते विचारतात, “आम्हाला कोण ऐकू शकेल?”
तुम्ही सर्वजण या एका मनुष्याला खाली पाडावयास, कुठपर्यंत माझ्यावर प्रहार करीत राहणार? मी तर एका वाकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.
मला उच्च स्थानावरून खाली पाडण्याचा त्यांचा बेत आहे; त्यांना खोटे बोलणे आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, परंतु मनातून शाप देतात. सेला