Skip to content

Malice बद्दल बायबलमधील वचने

135 वचने · 29 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या कारस्थानापासून मला लपवा.

  2. तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.

  3. दबा धरून ते निरपराध्यांवर बाण सोडतात; ते निर्भयपणे अकस्मात त्यांच्यावर मारा करतात;

  4. दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात; सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात; ते म्हणतात, “ते कोण पाहणार?”

  5. ते कुटिल योजना बनवून म्हणतात, “आता आम्ही उत्तम योजना तयार केली आहे!” मानवी अंतःकरण आणि हृदय समजणे कठीण आहे.

  6. जेव्हा मी शोक करून उपास केला, तेच माझ्यासाठी निंदेचे कारण ठरले;

  7. जेव्हा मी गोणपाट पांघरले, तेव्हा ते माझ्याबद्दल उपहासाने बोलू लागले.

  8. मी गावातील लोकांच्या कुत्सित चर्चेचा विषय झालो आहे आणि मी मद्यप्यांच्या गीतांचा विषय झालो आहे.

  9. माझा जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.

  10. जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात, ते लज्जित होऊन माघारी फिरोत.

  11. माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात; माझा जीव घेणारे एकत्र येऊन मसलत करतात.

  12. ते म्हणतात, “परमेश्वराने त्याचा त्याग केला आहे; त्याचा पाठलाग करून त्याला धरा, कारण त्याला कोणीही सोडविणारा नाही.”

  13. कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी माझ्याविरुद्ध त्यांचे मुख उघडले आहे; ते माझ्याविरुद्ध असत्य गोष्टी बोलले आहेत.

  14. त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला; विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात.

  15. माझ्या मैत्रीच्या बदल्यात ते माझ्यावर आरोप करतात, परंतु मी निरंतर प्रार्थना करणारा मनुष्य आहे.

  16. ते बर्‍याची फेड वाईटाने करतात आणि प्रीतीच्या मोबदल्यात द्वेष करतात.

  17. कारण त्याने इतरांना दया दाखविली नाही, उलट गरजवंतांचा त्याने छळ केला आणि दुःखीकष्टी लोकांचा त्यांना मृत्यू येईपर्यंत पाठलाग केला.

  18. इतरांना शाप देणे त्याला आवडत असे— म्हणून त्याचे शाप त्याच्यावरच उलटू द्या. इतरांचे हितचिंतन करण्यात त्याला आनंद वाटत नसे— म्हणून त्याचेही हित न होवो.

  19. त्याने शापाला आपली वस्त्रे म्हणून पांघरली; ते त्याच्या शरीरात पाण्यासारखे, व त्याच्या हाडात तेलासारखे शिरले.

  20. संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा.

  21. ते सतत मनात दुष्ट योजना करीत असतात व दररोज युद्ध भडकावित असतात.

  22. त्यांनी त्यांच्या जिभा सर्पाच्या जिभेप्रमाणे तीक्ष्ण केली आहे; नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते. सेला

  23. दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत.

  24. कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.

  25. दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.