Skip to content

Malice बद्दल बायबलमधील वचने: Joab

6 वचने · 29 पैलू

Joab बद्दल वचने

  1. जेव्हा योआबाला ही बातमी कळली, तो याहवेहच्या मंडपाकडे पळून गेला आणि वेदीवरील शिंगे धरून राहिला. अबशालोमसोबत तो जरी मिळाला नव्हता तरीही अदोनियाहसोबत त्याने कट रचला होता.

  2. शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.”

  3. तेव्हा बेनाइयाह याहवेहच्या मंडपामध्ये गेला आणि योआबाला म्हणाला, “राजा म्हणतो ‘बाहेर ये!’ ” परंतु त्याने उत्तर दिले, “नाही, मी येथेच मरेन.” तेव्हा बेनाइयाहने राजाला कळवले, “योआबाने मला असे उत्तर दिले.”

  4. तेव्हा राजाने बेनाइयाहला आज्ञा केली, “तो म्हणतो तसे कर. त्याला मारून त्याला गाडून टाक आणि योआबाने विनाकारण रक्त सांडल्याच्या दोषातून मला व माझ्या सर्व कुटुंबाला मुक्त कर.

  5. त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.

  6. त्यांच्या रक्ताचा दोष योआबाच्या व त्याच्या वंशजांच्या माथ्यावर सर्वकाळ असो. परंतु दावीद व त्याचे वंशज, त्याचे घराणे आणि त्याचे राजासन यावर याहवेहची शांती सदा असो.”