Skip to content

Malice बद्दल बायबलमधील वचने

135 वचने · 29 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे, तू लाजेने झाकून जाशील; आणि तुझा कायमचा नाश करण्यात येईल.

  2. अनोळखी लोकांनी जेव्हा त्याची संपत्ती पळवून नेली त्या दिवशी तू अलिप्त राहिला आणि परदेशी लोक त्याच्या वेशीत शिरले आणि यरुशलेमसाठी चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा तू त्यांच्यापैकी एक होतास.

  3. आपल्या भावाच्या दुःखाच्या दिवशी त्याच्याबद्दल आनंद करू नकोस, किंवा यहूदीयाच्या रहिवाशांवर आनंद मानू नकोस, त्यांच्या संकटाच्या दिवशी अधिक गर्व करू नकोस.

  4. तुम्ही माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी माझ्या लोकांच्या नगरात प्रवेश करू नका, किंवा त्यांच्या आपत्तीच्या दिवशी त्यावर आनंद करू नका, किंवा त्यांच्या विपत्तीच्या दिवशी. त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवू नका.

  5. त्यांच्या फरार झालेल्यांना मारण्यासाठी चौकात उभा राहू नको किंवा त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांच्या शत्रूच्या स्वाधीन करू नको.

  6. “सर्व राष्ट्रांसाठी नेमलेला याहवेहचा दिवस जवळ आला आहे. जसे तू केलेस, तसे तुझ्यासोबतही केले जाईल होईल; तुझ्याद्वारे करण्यात आलेली दुष्कर्मे तुझ्याच माथ्यावर उलटतील.

  7. “ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’ असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे,

  8. पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा.

  9. जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका.

  10. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.

  11. “पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली.

  12. “त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’

  13. “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले.

  14. जेव्हा इतर नोकरांनी हे पाहिले, तेव्हा ते क्रोधाने भरून प्रभूकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले.”

  15. तेव्हा प्रभूने ज्या नोकराला क्षमा केली होती, त्या नोकराला बोलाविले. राजा त्याला म्हणाला, “अरे दुष्ट माणसा, मी तुझे सर्व कर्ज माफ केले, कारण तू मला तशी विनंती केलीस;

  16. ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय?

  17. मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले.

  18. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”

  19. येशूने असे म्हटल्यावर, जवळ असणार्‍या अधिकार्‍यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व “अशा रीतीने तू महायाजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली.

  20. येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?”

  21. मग दुसर्‍या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत.

  22. चाळीस किंवा त्याहून अधिक यहूदी या कटकारस्थानामध्ये सामील झाले.

  23. नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे.

  24. सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले.

  25. ते निंदक, परमेश्वराचा द्वेष करणारे, उद्धट, गर्विष्ठ आणि बढाईखोर, नव्या वाईट मार्गाचा विचार करणारे, आणि आईवडिलांची आज्ञा न मानणारे झाले;