मुख्य मजकुरावर जा

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत; ते आपल्या चांदीपासून स्वतःसाठी मूर्ती बनवतात, हुशारीने तयार केलेल्या प्रतिमा, त्या सर्व कारागिरांची हस्तकृती आहेत. या लोकांबद्दल असे म्हटले जाते, “हे नरबली देतात! ते वासराच्या मूर्तीचे चुंबन घेतात!”

  2. म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे, पहाटेच्या लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे, खळ्यातून उडून जाणार्‍या भुशासारखे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे होतील.

  3. “तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्याशिवाय इतर कोणत्याही परमेश्वराला तू स्वीकारणार नाहीस, माझ्याशिवाय इतर कोणीही तारणारा नाही.

  4. “बेथेलास जा आणि पाप करा; गिलगालास जाऊन आणि अधिक पाप करा. रोज सकाळी आपली अर्पणे, दर तीन वर्षांनी आपला दशांश आणा.

  5. उपकारस्तुती म्हणून खमिराची भाकरी जाळून टाका आणि तुमच्या स्वैच्छिक अर्पणांची फुशारकी मारा; इस्राएली लोकहो तुम्ही याविषयी बढाई मिरवा, कारण असेच करणे तुम्हाला आवडते.” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  6. यहूदीयाचे राजे योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या कारकिर्दीत, मोरेशेथचा रहिवासी मीखाहला याहवेहचा संदेश आला—त्याने शोमरोन आणि यरुशलेमबद्दल दृष्टान्तात पाहिला.

  7. सर्व लोकहो, तुम्ही सर्वजण, ऐका, पृथ्वी आणि जे सर्व त्यामध्ये राहतात, लक्ष द्या, सार्वभौम याहवेह परमेश्वर, त्यांच्या पवित्र मंदिरातून, तुमच्याविरुद्ध साक्ष देतील.

  8. पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत. ते खाली उतरतात आणि पृथ्वीच्या उंच जागा तुडवितात.

  9. त्यांच्या पायाखाली पर्वत वितळतात जसे अग्नीपुढे मेण, जसे पाणी उतारावरून खाली येते, तशा दऱ्या दुभंगतात.

  10. हे सर्व याकोबाच्या अपराधामुळे आणि इस्राएली लोकांच्या पापाचे परिणाम आहे. याकोबाचा अपराध काय आहे? ते शोमरोन आहे की नाही? यहूदीयाचे उच्च स्थान कोणते आहे? ते यरुशलेम नाही की नाही?

  11. “म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा, द्राक्षमळे लावण्याची जागा करेन. मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन आणि तिचा पाया उघडा करेन.

  12. तिच्या सर्व मूर्ती फोडून तुकडे करण्यात येतील; तिच्या मंदिरातील सर्व भेटवस्तू अग्नीत भस्म होतील; मी तिच्या सर्व प्रतिमा नष्ट करेन. कारण तिने आपल्या भेटवस्तू वेश्याव्यवसाय करून मिळवल्या आहेत, आणि त्या पुन्हा वेश्यावृत्तीची मजुरी म्हणून वापरली जाईल.”

  13. म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन.

  14. कारण शोमरोनची पीडा असाध्य आहे; ती यहूदीयामध्ये पसरली आहे. ती माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे, ती यरुशलेमपर्यंतही पोहोचली आहे.

  15. मी तुमच्यातील चेटके नष्ट करेन आणि यापुढे तुझ्यामध्ये कोणीही शकुन पाहणार नाही.

  16. मी तुमच्या मूर्ती आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन; तुमच्या हस्तकृतींना तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही.

  17. जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन, तेव्हा तुझे अशेरा स्तंभ उपटून टाकीन.

  18. “मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे? किंवा प्रतिमा, जी असत्य शिकविते? स्वतःच्या हस्तकृतीवर भरवसा ठेवणारे; तो मूर्ती घडवितो जी बोलू शकत नाही.

  19. धिक्कार असो, जो लाकडाला म्हणतो, ‘जिवंत हो!’ किंवा निर्जीव दगडाला म्हणतो, ‘जागा हो!’ ते मार्गदर्शन करू शकतात काय? त्या सोन्याने व रुप्याने मढविलेल्या आहेत; पण त्यांच्यात श्वास नाही.”

  20. यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.

  21. ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको.

  22. दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत.

  23. “जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.”

  24. येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”

  25. “परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. याव्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही, कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली.