Idolatry बद्दल बायबलमधील वचने: Folly of
Folly of बद्दल वचने
मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?
ज्या दैवतांनी त्यांच्या यज्ञातील चरबीचे सेवन केले आणि त्यांच्या द्राक्षारसाचे रसपान केले, ती दैवते आता कुठे आहेत? त्या दैवतांनी तुमच्या मदतीसाठी आता जागे व्हावे! त्यांनी त्यांचे आश्रयस्थान व्हावे!
जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले.
परंतु दुसर्या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते.
त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.
त्याने दिमिष्कच्या दैवतांना बलिदान केले, ज्यांनी त्याचा पराभव केला होता; कारण त्याला वाटले, “अरामच्या राजांच्या दैवतांनी त्यांना मदत केली म्हणून मी त्यांना बलिदान करेन म्हणजे ते मला मदत करतील.” परंतु तेच त्याचे आणि सर्व इस्राएलचे पतन होण्याचे कारण होते.
पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.
त्यांना तोंडे आहेत, पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, पण ते बघू शकत नाहीत.
परंतु राष्ट्रांच्या मूर्ती चांदीच्या आणि सोन्याच्या आहेत, त्या तर मानवी हातांनी घडविलेल्या आहेत.
त्यांना तोंडे आहेत, परंतु बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत, परंतु ते बघू शकत नाहीत.
त्यांना कान आहेत, परंतु ऐकू येत नाही, ना त्यांना श्वास घेता येतो.
जे मूर्ती घडवितात ते त्यांच्यासारखेच होतील, आणि सर्वजण जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात तेही तसेच होतील.
त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?
याहवेहचा आत्मा कोण जाणू शकेल, किंवा याहवेहना सल्ला देऊ शकेल असा कोण सल्लागार आहे?
ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला, आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला? असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले, किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला?
राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत; त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते; बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.
लबानोनांच्या विशाल वनाची लाकडे वेदीच्या अग्नीसाठी पुरेशी नाहीत, तसेच होमार्पणासाठी तेथील असंख्य जनावरे सुद्धा पुरेशी नाहीत.
त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत; ते त्यांना निरुपयोगी असे समजतात. त्यांच्या दृष्टीने शून्यवत आहेत.
तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल? तुम्ही कोणत्या प्रतिमेला त्यांची उपमा द्याल?
एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो, आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो.
गरीब लोक अशा प्रकारचे अर्पण करू शकत नाही सडले जाणार नाही, असे लाकूड ते निवडतात; ती मूर्ती पडणार नाही अशी तिची रचना करण्यासाठी ते एका कुशल कारागिराला शोधतात.
तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? तुम्हाला ते सुरुवातीपासूनच सांगितले नव्हते काय? पृथ्वीची स्थापना होताच तुम्ही ते कधी जाणले नाही काय?
जे पृथ्वीवरील मंडलावर विराजमान होतात, त्यावरील लोक त्यांना टोळांप्रमाणे दिसतात. ते आकाशे एखाद्या आच्छादनाप्रमाणे पसरवितात, आणि तंबूप्रमाणे त्याला फैलावून आपला डेरा तयार करतात.
ते राजपुत्रांना तुच्छतेस आणतात आणि या जगातील राज्यकर्त्यांना शून्यवत करून टाकतात.
लागण करताच, पेरणी करताच, ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.