Idolatry बद्दल बायबलमधील वचने: Warnings against
Warnings against बद्दल वचने
याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही;
म्हणून कोणत्याही पुरुष अथवा स्त्रीच्या आकाराची कोरीव मूर्ती करून तुम्ही स्वतःला भ्रष्ट करू नये,
किंवा पृथ्वीवरील एखाद्या पशूची किंवा आकाशात उडणार्या कोणत्याही पक्ष्याची,
अथवा जमिनीवर रांगणार्या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये.
जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत.