मुख्य मजकुरावर जा

Idolatry बद्दल बायबलमधील वचने: A virtual forsaking of God

5 वचने · 205 पैलू

A virtual forsaking of God बद्दल वचने

  1. “यास्तव मी तुमच्याविरुद्ध आरोप करणार आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “आणि मी तुमच्या मुलांच्या मुलांवरही आरोप लावणार.

  2. समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:

  3. कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय? (जरी ते सर्व देव नाहीतच.) परंतु माझ्या लोकांनी आपल्या गौरवी परमेश्वराची व्यर्थ मूर्तींशी अदलाबदल केली.

  4. हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा आणि भीतीने गर्भगळीत व्हा,” अशी याहवेह घोषणा करतात.

  5. “माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्‍याला, म्हणजे मला, सोडले आहे, आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.