Idolatry बद्दल बायबलमधील वचने: Followed the Assyrians in
Followed the Assyrians in बद्दल वचने
तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही.
तेव्हा तू आपली व्यभिचारी प्रवृत्ती वाढवली व बाबिलोन जो व्यापाऱ्यांच्या देशाला सामील केले, परंतु त्यातही तू तृप्त झाली नाही.
“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात की, जेव्हा तू या सर्व गोष्टी करीत एका निर्लज्ज वेश्येप्रमाणे वागतेस, तेव्हा मी तुझ्याविरुद्ध क्रोधाने भरतो!
“ओहोलाह माझी असतानाच वेश्यावृत्ती करू लागली; आणि तिचे प्रियकर; म्हणजेच अश्शूरी योद्ध्यांची अभिलाषा करू लागली
ते निळी वस्त्रे घातलेले, राज्यपाल व सेनापती होते, ते सर्व सुंदर तरुण पुरुष घोडेस्वार होते.
तिने स्वतःला या उच्चभ्रू अश्शूरी लोकांच्या स्वाधीन करून ज्या सर्वांच्या मूर्तींची आस धरली होती त्यामुळे स्वतःला विटाळवून टाकले.