मुख्य मजकुरावर जा

Faith बद्दल बायबलमधील वचने

543 वचने · 124 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो थांबला, परंतु काय आहे ते मात्र मला समजेना. त्याचा आकार माझ्या डोळ्यासमोर होता, आणि त्याचे कुजबुजणे मी ऐकले:

  2. ‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय? बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?

  3. जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,

  4. तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?

  5. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे तुकडे होतात; कोणाच्या लक्षात न येताच ते सर्वकाळासाठी नष्ट होतात.

  6. त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून, त्यांच्या डेर्‍याचे दोर आतूनच कापले जात नाही काय?’

  7. “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.

  8. आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.

  9. जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन; व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन.

  10. खचितच ह्यातच माझी खरी मुक्ती आहे, कारण कोणी देवहीन व्यक्ती त्यांच्यासमोर येण्याचे धाडस करणार नाही!

  11. मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;

  12. आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन;

  13. होय, मी स्वतः त्यांना पाहीन दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन. त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे!

  14. मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.

  15. असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.

  16. दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.

  17. याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.

  18. माझे शत्रू मागे वळतात; ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात.

  19. कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात.

  20. याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.

  21. ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.

  22. दावीदाचे मिक्ताम परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.

  23. मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.”

  24. संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला, याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.

  25. याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.