- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Faith बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
To deliver their soul from death, and to keep them alive in famine.
आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.
त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे, कारण त्यांच्या पवित्र नावावर आमचा विश्वास आहे.
याहवेह तुमची अक्षय प्रीती आमच्या सभोवती असू द्या, कारण आमच्या आशेचे स्थान केवळ तुम्हीच आहात.
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा अबीमेलेखापुढे त्याने वेडा झाल्याचे ढोंग केल्यावर त्याला हाकलून लावण्यात आले आणि तो निघून गेला. मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन; माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.
याहवेहने माझ्यावर केलेल्या दयेची मी प्रतिष्ठा मिरवीन; हे ऐकून दीनजन हर्ष करोत.
तुम्ही माझ्याबरोबर याहवेहची स्तुती करा; आपण सर्व मिळून त्यांच्या नावाला उंच करू या.
कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.
जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात; त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही.
या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला; त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.
याहवेहचे भय धरणार्याभोवती त्यांचे देवदूत छावणी देतात आणि त्याला ते सोडवितात.
याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.
याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात.
याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात; दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात, कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे.
त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास माझ्या मुखात नवीन गीत दिले. हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील.
जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्यांच्या वार्यासही उभे राहत नाही, ते धन्य होत.
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.
माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे; तेव्हा मी यार्देन प्रदेशातून आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून तुमचे स्मरण करणार.
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत. परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,
सागरांच्या जलांनी गर्जना केल्या, आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला
त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले.
ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला
मी तर परमेश्वराचा धावा करेन आणि याहवेह माझे तारण करतील.
संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी मी वेदनांनी आरोळी देईन आणि ते माझी वाणी ऐकतील.