मुख्य मजकुरावर जा

Faith बद्दल बायबलमधील वचने

543 वचने · 124 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन.

  2. परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार?

  3. तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत; तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत; तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय?

  4. ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत.

  5. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे. माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.

  6. जे मला निर्दोष ठरवितात, त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.

  7. ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील; जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.

  8. तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन; कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.

  9. तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात. परमेश्वर माझ्यापुढे जातील, मग मी माझ्या निंदकांवर समाधानतेने उपहासात्मक दृष्टी टाकू शकेन.

  10. मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?

  11. परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?

  12. तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा; ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.

  13. तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो. तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा.

  14. तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे.

  15. खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.

  16. माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.

  17. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  18. कारण तुम्ही माझे साहाय्य आहात, तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो.

  19. कारण परमेश्वर सीयोनचे रक्षण करतील यहूदाह प्रांतातील शहरे ते पुन्हा स्थापित करतील. त्यांचे लोक तिथे वस्ती करतील आणि तेथील अधिकार घेतील;

  20. त्यांच्या सेवकांच्या मुलांनाही हा देश वतन म्हणून मिळेल, त्यांच्या नावावर प्रीती करणारे सर्वजण तिथे वसती करतील.

  21. प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.

  22. जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे; तुम्ही मला माझ्या आईच्या गर्भातून बाहेर आणले. मी सर्वकाळ तुमची स्तुती करेन.

  23. अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे; तुम्ही माझे प्रबळ शरणस्थान आहात.

  24. असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या तुम्ही मला दाखविल्या आहेत, तरी तुम्ही मला नवजीवन द्याल, आणि पृथ्वीच्या गर्भातून तुम्ही मला पुन्हा वर काढाल.

  25. तुम्ही माझा सन्मान वाढवाल आणि माझ्याकडे वळून पुनः माझे सांत्वन कराल.