Skip to content

Faith बद्दल बायबलमधील वचने: General references

147 वचने · 124 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.

  2. ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.

  3. परंतु जे त्यांचे भय धरतात, ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते. ते त्यांना मृत्यूपासून सोडवून, दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.

  4. To deliver their soul from death, and to keep them alive in famine.

  5. दावीदाचे स्तोत्र; जेव्हा अबीमेलेखापुढे त्याने वेडा झाल्याचे ढोंग केल्यावर त्याला हाकलून लावण्यात आले आणि तो निघून गेला. मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन; माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.

  6. याहवेहने माझ्यावर केलेल्या दयेची मी प्रतिष्ठा मिरवीन; हे ऐकून दीनजन हर्ष करोत.

  7. तुम्ही माझ्याबरोबर याहवेहची स्तुती करा; आपण सर्व मिळून त्यांच्या नावाला उंच करू या.

  8. कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.

  9. जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात; त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही.

  10. या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला; त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.

  11. याहवेहचे भय धरणार्‍याभोवती त्यांचे देवदूत छावणी देतात आणि त्याला ते सोडवितात.

  12. याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.

  13. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली.

  14. जेणेकरून येणार्‍या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे.

  15. मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील.

  16. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

  17. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.

  18. नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.

  19. अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.

  20. “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,

  21. ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”

  22. मग येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, तुम्ही संशय न धरता विश्वास ठेवाल, तर जे काही अंजिराच्या झाडाबाबत झाले ते तुम्ही सुद्धा कराल, या डोंगराला ‘ऊठ आणि समुद्रात पड,’ असे तुम्ही म्हणालात, तर ही गोष्ट केली जाईल.

  23. तुम्ही विश्वास ठेऊन आणि प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”

  24. “जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.”

  25. मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!”