मुख्य मजकुरावर जा

Faith बद्दल बायबलमधील वचने

543 वचने · 124 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे.

  2. तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.

  3. मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे: की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे.

  4. मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन; पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन.

  5. मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.”

  6. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली.

  7. जेणेकरून येणार्‍या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे.

  8. मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील.

  9. जो परमोच्चाच्या आश्रयाखाली राहतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.

  10. मी याहवेहला म्हणेन, “तेच माझा आश्रय व माझा दुर्ग आहेत, माझे परमेश्वर, ज्यांच्यावर मी भरवसा ठेवला आहे.”

  11. जर तू म्हणाला, “याहवेह माझे आश्रयस्थान आहेत,” आणि तू परमोच्चास आपले निवासस्थान केलेस,

  12. तर तुला कोणतीही इजा होणार नाही, किंवा कोणतेही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही.

  13. याहवेह आपल्या प्रजेचा त्याग करणार नाहीत; त्यांच्या वारसांना ते कधीही टाकणार नाहीत.

  14. न्यायनिवाडा पुन्हा न्यायीपणानेच होईल, आणि नीतिमान हृदयाचे त्याचे पालन करतील.

  15. याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.

  16. “हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला, तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले.

  17. मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?

  18. परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?

  19. शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.

  20. परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.

  21. वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

  22. यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.

  23. याहवेह आमची आठवण ठेवतात, ते आम्हाला आशीर्वाद देतील: ते इस्राएली लोकांना आशीर्वाद देतील, ते अहरोनाच्या वंशजांना आशीर्वाद देतील,

  24. आणि जे याहवेहचे भय बाळगतात त्यांना आशीर्वाद देतील— सर्व लहानथोरांना एकसमान.

  25. याहवेह तुम्हाला समृद्ध करो, तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही.