मुख्य मजकुरावर जा

Faith बद्दल बायबलमधील वचने

543 वचने · 124 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी लज्जित होणार नाही, कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.

  2. मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा!

  3. सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.

  4. “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,

  5. ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”

  6. मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”

  7. जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.

  8. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.

  9. मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.

  10. कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.

  11. त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल.

  12. जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.

  13. कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत.

  14. जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.

  15. यावेळी काही ज्योतिषी राजाकडे गेले व यहूदींवर आरोप लावला.

  16. ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू असा!

  17. महाराज तुम्ही आदेश दिला आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच सर्वांनी सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी,

  18. आणि जो कोणी असे करणार नाही त्याला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात यावे.

  19. परंतु काही यहूदी आहेत ज्यांना तुम्ही बाबेलच्या कारभारावर नेमलेले आहे—शद्रख, मेशख, व अबेदनगो—जे तुमच्या आज्ञेकडे लक्ष्य देत नाही. महाराज, यांनी आपली आज्ञा मानली नाही. ते तुमच्या दैवतांची सेवा करीत नाही किंवा आपण उभारलेल्या सुवर्ण पुतळ्याला नमनही करीत नाही.”

  20. नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त झाला व शद्रख, मेशख व अबेदनगो यांना हजर करावे असा त्याने हुकूम दिला. तेव्हा या लोकांना राजासमोर आणण्यात आले,

  21. नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “शद्रख, मेशख आणि अबेदनगो, तुम्ही माझ्या दैवतांची सेवा व मी स्थापन केलेल्या सुवर्ण पुतळ्याची उपासना करीत नाही, हे खरे आहे काय?

  22. मग आता जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच मी तयार केलेल्या पुतळ्याला तुम्ही नमन केले आणि उपासना केली तर उत्तम. परंतु जर तुम्ही उपासना नाही केली तर त्याच घटकेस तुम्हाला अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणता देव तुम्हाला सोडवितो ते पाहूया?”

  23. शद्रख, मेशख व अबेदनगो यांनी त्याला उत्तर दिले, “नबुखद्नेस्सर महाराज, याबद्दल तुमच्यासमोर आमचा बचाव करण्याची आम्हाला गरज नाही.

  24. जर आम्हाला धगधगत्या भट्टीत टाकले, तर आमचे परमेश्वर ज्यांची आम्ही सेवा करतो ते आम्हाला तिच्यातून सोडविण्यास समर्थ आहे आणि महाराज, तेच आम्हाला आपल्या हातून सोडवतील.

  25. परंतु असे जरी झाले नाही, तरीही महाराज तुम्हाला हे कळावे की आम्ही तुझ्या दैवतांची सेवा करणार नाही किंवा आपण स्थापन केलेल्या या सुवर्ण पुतळ्याला नमनही करणार नाही.”