मुख्य मजकुरावर जा

Faith बद्दल बायबलमधील वचने

543 वचने · 124 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे.

  2. जर तुमच्यापैकी एकजण त्यांना म्हणतो, “शांतीने जा; ऊब घ्या व खाऊन तृप्त व्हा,” परंतु त्यांच्या शारीरिक गरजासंबंधी काही करीत नाही, तर काय उपयोग?

  3. त्याचप्रमाणे, विश्वासाला जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे.

  4. पण कोणी म्हणेल, “तुझ्याजवळ विश्वास आहे; आणि माझ्याकडे क्रिया आहे.” तुझा विश्वास क्रियांवाचून मला दाखव आणि मी माझा विश्वास माझ्या कृत्यांद्वारे सिद्ध करतो.

  5. परमेश्वर एकच आहे असा तुमचा विश्वास आहे. तर उत्तम! दुरात्मे देखील विश्वास धरतात आणि भीतीने थरथर कापतात.

  6. अरे मूर्ख माणसा, कृती शिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे का?

  7. आपला पिता अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाकाला वेदीवर अर्पण केले आणि त्या कृत्यामुळे त्याला नीतिमान ठरविण्यात आले नाही का?

  8. तुम्हीच पाहा, त्याचा विश्वास आणि कृती एकत्रित कार्य करत होते आणि त्याने जे काही केले त्याद्वारे त्याचा विश्वास पूर्ण झाला.

  9. आणि जे शास्त्रलेखात सांगितले ते पूर्ण झाले, “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले,” आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले.

  10. तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो.

  11. त्याचप्रमाणे, राहाब वेश्याने हेरांना राहण्यासाठी जागा दिली आणि त्यांना दुसर्‍या मार्गाने पाठवून दिले, यात ती तिच्या कृत्यामुळे नीतिमान ठरली नाही का?

  12. जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.

  13. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  14. आता जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत, “जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.”

  15. कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.

  16. जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात.

  17. मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, तुम्ही जे परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळालेले आहे.

  18. आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात.