मुख्य मजकुरावर जा

Church (2) बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्ही याल आणि सीयोनावर दया कराल, कारण तिच्यावरील कृपादृष्टीची वेळ येऊन ठेपली आहे; तो निश्चित समय आलेला आहे.

  2. यातील प्रत्येक धोंड्यावर तुमचे सेवक प्रीती करतात; येथील धूळ देखील त्यांचे मन द्रवित करते.

  3. “याहवेहने आपल्या महान पवित्रस्थानातून खाली दृष्टी टाकली, त्यांनी स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिले,

  4. जेणेकरून गुलामगिरीतील लोकांचे कण्हणे ऐकावे आणि मृत्युदंड मिळालेल्यांची सुटका करावी.”

  5. म्हणजे सर्व लोक याहवेह देवाची महिमा सीयोनात जाहीर करतील आणि यरुशलेमात त्यांची स्तुती करतील.

  6. प्रवाशांचे आराधना गीत. जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.

  7. आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”

  8. याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.

  9. नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो— इस्राएलास शांती लाभो.

  10. कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे, आपल्या निवासस्थानासाठी त्यांची ही अभिलाषा आहे, ते म्हणतात,

  11. “हे माझे कायमचे विश्रांतीचे स्थान आहे; मी येथे विराजमान होईन, कारण येथेच राहण्याची माझी इच्छा आहे.

  12. मी या नगरीची भरभराट करेन; तिच्यातील गरिबांना अन्न देऊन तृप्त करेन.

  13. तेथील याजकांना तारणाची वस्त्रे नेसवेन, तेथील भक्त आनंदाने सदैव जयजयकार करतील.

  14. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,

  15. ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या, अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या, झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.

  16. हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.

  17. प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.

  18. पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.

  19. स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.

  20. आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.

  21. आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

  22. कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

  23. या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

  24. हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

  25. जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.