मुख्य मजकुरावर जा

Church (2) बद्दल बायबलमधील वचने: Love for

18 वचने · 7 पैलू

Love for बद्दल वचने

  1. याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.

  2. नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो— इस्राएलास शांती लाभो.

  3. आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.

  4. आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

  5. कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

  6. या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

  7. हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

  8. जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

  9. अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको,

  10. आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको.

  11. जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन; आणि तुम्ही यरुशलेमाप्रीत्यर्थ सांत्वन पावाल.”

  12. हे तुमच्या नजरेस पडताच, तुम्हाला आनंदाचे भरते येईल व तुम्ही गवतासारखे बहरून जाल; याहवेहचा कल्याणकारी हात त्यांच्या सेवकांस प्रकट होईल, पण त्यांच्या शत्रूंना त्यांचा क्रोध दाखविण्यात येईल.

  13. जे तुम्ही तलवारीपासून वाचला आहात, ते तुम्ही निघून जा, उगाच रेंगाळू नका! दूरवरील भूमीवर याहवेहचे स्मरण करा, आणि यरुशलेम तुमच्या स्मरणात येवो.”

  14. “आमची अप्रतिष्ठा झाली आहे, आमचा अपमान झाला आहे लज्जेने आमची मुखमंडले झाकली गेली आहेत, कारण परकीय लोकांनी याहवेहच्या भवनातील पवित्रस्थानी प्रवेश केला आहे.”

  15. माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत.

  16. माझे डोळे अखंडपणे, न थांबता, अश्रुपात करीत राहतील,

  17. याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील.

  18. माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे.