Church (2) बद्दल बायबलमधील वचने: Dissensions in
Dissensions in बद्दल वचने
कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे.
माझ्या म्हणण्याचा अर्थ हा: तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे,” तर कोणी “मी अपुल्लोसाचा” आणखी कोणी “मी केफाचा अनुयायी आहे,” आणखी कोणी “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे.”
ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का?
तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही?
तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
पहिली गोष्ट अशी की मंडळी म्हणून तुम्ही एकत्र येत असला तरी, तुमच्यात फूट आहे, असे मी ऐकतो आणि त्यावर काही अंशी माझा विश्वास आहे.
तुम्हामध्ये मतभेद असणे गरजेचे आहे, म्हणजे परमेश्वराने मान्यता दिलेले कोण आहेत, हे आपोआप उघड होईल.
कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल.
होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.