मुख्य मजकुरावर जा

Church (2) बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पाहा, सार्वभौम याहवेह सामर्थ्याने येत आहेत, आणि ते बलाढ्य हाताने राज्य करतात. पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याबरोबर आहे, आणि ते देत असलेला मोबदला त्यांच्याबरोबर आहे.

  2. ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.

  3. परंतु आता, याहवेह असे म्हणतात— याकोबा, ज्यांनी तुला निर्माण केले, इस्राएला, ज्यांनी तुझी रचना केली: “भिऊ नको, कारण खंडणी भरून मी तुझी सुटका केली आहे. मी तुला नावाने हाक मारली आहे; तू माझीच आहेस.

  4. जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.

  5. कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता; तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले, तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले,

  6. कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस, आणि मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्या मोबदल्यात लोकांना देईन, तुझ्या जिवाच्या मोबदल्यात मी राष्ट्रांना देईन.

  7. भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मीच तुझ्या संततीला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून एकत्र करेन,

  8. मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’ आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’ माझ्या पुत्रांना दूरवरून आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या—

  9. जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो, ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.”

  10. परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे; प्रभू आम्हाला विसरले आहेत.”

  11. “आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का आपल्या जन्मदात्या मुलावरील तिची माया कधी आटेल का? ती कदाचित विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही.

  12. पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे व तुझे तट सदोदित माझ्यासमोर आहेत.

  13. तुमची संतती घाईघाईने परत येईल, आणि तुम्हाला उजाड करणारे तुम्हाला सोडून निघून जातील.

  14. ऊठ, ऊठ, हे सीयोना, सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! यरुशलेम, हे पवित्र नगरी, आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. बेसुंती आणि भ्रष्ट यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.

  15. हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, ऊठ व सिंहासनारुढ हो. बंदिवान सीयोनकन्ये, दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो.

  16. पर्वतावरून शुभवार्ता आणणार्‍याचे पाय किती मनोरम आहेत, जे आनंददायी वार्ता आणतात, जे शांतीची घोषणा करतात, जे शुभ संदेश आणतात, जे तारणाची घोषणा करतात, जे सीयोनास म्हणतात, “तुमचे परमेश्वर राज्य करतात!”

  17. ऐका! तुमचे पहारेकरी त्यांचा आवाज उंचावतात; एकत्र मिळून ते आनंदाचा जयघोष करतात. जेव्हा याहवेह सीयोनास परत येतील, ते प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहतील.

  18. यरुशलेमच्या उद्ध्वस्त स्थळांनो, सर्वांनी एकत्र उसळून हर्षगीतांनी जयघोष करा, कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्यांनी यरुशलेमास सोडविले आहे.

  19. याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल.

  20. निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.

  21. परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही वा घाईने निघावे लागणार नाही; कारण याहवेह तुमच्यापुढे जातील, आणि इस्राएलचे परमेश्वर तुमचे पाठीराखे असतील.

  22. “ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.

  23. पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे, आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे, परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे, आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे.

  24. राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील, आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील.

  25. “आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा: सर्व सभा एकत्र येऊन तुझ्याकडे येत आहे; तुझे पुत्र दूरवरून येत आहेत, तुझ्या कन्या कमरेवर उचलून आणण्यात येत आहेत.