circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ७:११सुमारे इ.स.पू. ६१०
हे मंदिर ज्याने माझे नाव धारण केले आहे, तुमच्यासाठी लुटारूंची गुहा झाली आहे काय? परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिले आहे! अशी याहवेह घोषणा करीत आहेत.
- यिर्मयाह ७:१२सुमारे इ.स.पू. ६१०
“ ‘शिलोह नगरात जा, जिथे मी सर्वप्रथम माझ्या नावाचे निवासस्थान केले, आणि माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्टाईमुळे मी काय केले ते पाहा.
- यिर्मयाह ७:१३सुमारे इ.स.पू. ६१०
याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही.
- यिर्मयाह ७:१४सुमारे इ.स.पू. ६१०
म्हणून माझे नाव धारण केलेले मंदिर, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता, जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले होते, आता त्या मंदिराचे, मी शिलोहचे केले तसेच करेन.
- यिर्मयाह ७:१५सुमारे इ.स.पू. ६१०
मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’
- यिर्मयाह ७:१६सुमारे इ.स.पू. ६१०
“म्हणून या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, किंवा यांच्यासाठी माझ्याकडे विनंती किंवा विनवण्या करू नकोस. कारण मी तुझे ऐकणार नाही.
- यिर्मयाह ७:१७सुमारे इ.स.पू. ६१०
यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का?
- यिर्मयाह ७:१८सुमारे इ.स.पू. ६१०
मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात.
- यिर्मयाह ७:१९सुमारे इ.स.पू. ६१०
याहवेह विचारतात, या त्यांच्या करणीने ते मला चिथावणी देतात का? नाही! यामुळे त्यांचेच मोठे नुकसान होत नाही का, त्यांचीच बेअब्रू होत नाही का?
- यिर्मयाह ७:२०सुमारे इ.स.पू. ६१०
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी माझा कोप आणि माझा क्रोध मी या जागेवर ओतेन—लोक, पशू, वृक्ष, आणि रोपे भस्मसात होतील—आणि तो अग्नी भडकेल व तो न शमणार नाही.
- यिर्मयाह ७:२१सुमारे इ.स.पू. ६१०
“ ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: जा पुढाकार घ्या, तुमची होमार्पणे इतर अर्पणात टाका व ते मांस तुम्हीच खा!
- यिर्मयाह ७:२२सुमारे इ.स.पू. ६१०
तुमच्या पूर्वजांना मी इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना केवळ होमार्पणे व यज्ञार्पणे याविषयीच आज्ञा दिली नव्हती,
- यिर्मयाह ७:२३सुमारे इ.स.पू. ६१०
पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल.
- यिर्मयाह ७:२४सुमारे इ.स.पू. ६१०
पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.
- यिर्मयाह ७:२५सुमारे इ.स.पू. ६१०
तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो.
- यिर्मयाह ७:२६सुमारे इ.स.पू. ६१०
परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’
- यिर्मयाह ७:२७सुमारे इ.स.पू. ६१०
“जेव्हा हे सर्व तू त्यांना सांगशील, ते तुझे ऐकणार नाहीत; तू त्यांना हाक मारशील, पण ते त्यांना प्रतिसाद देणार नाहीत.
- यिर्मयाह ७:२८सुमारे इ.स.पू. ६१०
म्हणून त्यांना तू हे सांग, ‘आपल्या याहवेह परमेश्वराच्या आज्ञा झिडकारणारे व सुधारणा करण्यास तयार नसणारे असे हे राष्ट्र आहे. सत्यता नष्ट झाली आहे; त्यांच्या ओठातून ती नाहीशी झाली आहे.
- यिर्मयाह ७:२९सुमारे इ.स.पू. ६१०
“ ‘आपले केस कापून टाक, ते फेकून दे; आणि वनस्पतिहीन पर्वतावर विलाप कर, कारण याहवेहने आपल्या क्रोधामुळे या पिढीला धिक्कारले आहे व त्यांचा त्याग केला आहे.
- यिर्मयाह ७:३०सुमारे इ.स.पू. ६१०
“ ‘याहवेह म्हणतात, यहूदीयाच्या लोकांनी माझ्या दृष्टीत पाप केले आहे. ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्ती ठेवून, ते मंदिर भ्रष्ट केले आहे.
- यिर्मयाह ७:३१सुमारे इ.स.पू. ६१०
बेन-हिन्नोमच्या खोर्यात त्यांनी तोफेत नावाची एक उच्च वेदी बांधली आहे—तिथे त्यांच्या दैवतांना ते आपल्या मुलामुलींचे होमबली देतात—अशी आज्ञा मी त्यांना मुळीच दिली नव्हती, असे भयानक कृत्य माझ्या कधी मनातही आले नाही.
- यिर्मयाह ७:३२सुमारे इ.स.पू. ६१०
म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही.
- यिर्मयाह ७:३३सुमारे इ.स.पू. ६१०
नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही.
- यिर्मयाह ७:३४सुमारे इ.स.पू. ६१०
तेव्हा मी हर्षगीते व आनंदाचे गायन आणि वर-वधू यांचे आनंदी बोल यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावरून संपविणार आहे, कारण संपूर्ण भूमी उजाड अशी होईल.
- यिर्मयाह ८:१सुमारे इ.स.पू. ६१०
“ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.