circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ९:५सुमारे इ.स.पू. ६१०
मित्र मित्रास फसवितो, आणि कोणीही सत्य बोलत नाही. त्यांनी त्यांच्या जिभेला खोटे बोलणे शिकविले आहे; अगदी दमून जाईपर्यंत ते पाप करीत राहतात.
- यिर्मयाह ९:६सुमारे इ.स.पू. ६१०
तू फसवणुकीच्या मध्ये आपले निवास बनविले आहे; त्यांच्या या कपटामुळे ते माझे अस्तित्व नाकारतात,” असे याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह ९:७सुमारे इ.स.पू. ६१०
म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय?
- यिर्मयाह ९:८सुमारे इ.स.पू. ६१०
त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात.
- यिर्मयाह ९:९सुमारे इ.स.पू. ६१०
अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” अशी याहवेह घोषणा करतात. “या अशा राष्ट्रावर मी स्वतः सूड उगवू नये काय?”
- यिर्मयाह ९:१०सुमारे इ.स.पू. ६१०
मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन. कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत, गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षीसुद्धा उडून गेले आहेत. आणि जनावरेही गेली आहेत.
- यिर्मयाह ९:११सुमारे इ.स.पू. ६१०
“मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”
- यिर्मयाह ९:१२सुमारे इ.स.पू. ६१०
हे सर्व समजण्याइतपत शहाणा कोण आहे? याहवेहने हे त्याला समजावून सांगितले व तो त्याचे स्पष्टीकरण करेल तो कुठे आहे? हा देश एवढा ओसाड व वाळवंटासारखा का झाला की यातून प्रवास करण्यासही कोणी धजत नाही?
- यिर्मयाह ९:१३सुमारे इ.स.पू. ६१०
याहवेह म्हणाले, “कारण माझ्या लोकांनी माझ्या आज्ञांचा त्याग केला, जे मी त्यांच्यापुढे ठेवले होते; त्यांनी मला अनुसरण केले नाही व माझ्या नियमाचे पालन केले नाही.
- यिर्मयाह ९:१४सुमारे इ.स.पू. ६१०
याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.”
- यिर्मयाह ९:१५सुमारे इ.स.पू. ६१०
म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “पाहा, मी त्यांना कडू अन्न खावयास घालेन आणि विषारी पाणी प्यावयास देईन.
- यिर्मयाह ९:१६सुमारे इ.स.पू. ६१०
जे त्यांच्या पूर्वजांना माहीत नाही, अशा देशात मी त्यांची पांगापांग करेन, तिथे सुद्धा त्यांचा पूर्ण नायनाट करेपर्यंत माझी तलवार त्यांची पाठ सोडणार नाही.”
- यिर्मयाह ९:१७सुमारे इ.स.पू. ६१०
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “विचार करा! आक्रंदन करणार्या स्त्रियांना बोलवा; त्यामधून कुशल अशा स्त्रियांना पाठवा.
- यिर्मयाह ९:१८सुमारे इ.स.पू. ६१०
त्यांना त्वरित येऊ द्या आणि आमच्यासाठी आक्रोश करतील व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील.
- यिर्मयाह ९:१९सुमारे इ.स.पू. ६१०
सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”
- यिर्मयाह ९:२०सुमारे इ.स.पू. ६१०
आता स्त्रियांनो, याहवेहचे शब्द ऐका! त्यांच्या मुखातील शब्द ऐकण्यासाठी तुमचे कान उघडा. तुमच्या कन्यांना विलाप करण्यास शिकवा; एकमेकींना आकांत करण्यास शिकवा.
- यिर्मयाह ९:२१सुमारे इ.स.पू. ६१०
कारण तुमच्या खिडक्यातून मरणाचा शिरकाव झाला आणि त्याने आमच्या गडात प्रवेश केला आहे; त्याने रस्त्यांवरून बालकांना आणि तुमच्या तरुणांना चौकातून काढून घेतले आहे.
- यिर्मयाह ९:२२सुमारे इ.स.पू. ६१०
त्यांना सांग, “याहवेह असे म्हणतात: “ ‘मृतदेह उघड्या जागांवर विष्ठेप्रमाणे पसरली जातील; कापणार्यांच्या मागे पेंढ्या पडाव्यात तशी ती दिसतील, आणि कोणी मनुष्य त्यांना मूठमाती देणार नाही.’ ”
- यिर्मयाह ९:२३सुमारे इ.स.पू. ६१०
याहवेहने असे म्हणतात: “शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये. बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये.
- यिर्मयाह ९:२४सुमारे इ.स.पू. ६१०
जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी मी याहवेह, जो कृपा करणारा पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, असे त्यांनी मला खरोखर समजावे, ह्यात मला संतोष आहे, असे याहवेहने म्हणतात.”
- यिर्मयाह ९:२५सुमारे इ.स.पू. ६१०
याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे—
- यिर्मयाह ९:२६सुमारे इ.स.पू. ६१०
म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.”
- यिर्मयाह १०:१सुमारे इ.स.पू. ६०७
हे इस्राएलच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका.
- यिर्मयाह १०:२सुमारे इ.स.पू. ६०७
याहवेह असे म्हणतात: “इतर राष्ट्रांचे मार्ग शिकू नका जरी त्यांच्यामुळे इतर राष्ट्रे भयभीत होतात, तरी आकाशाच्या चिन्हांनी तुम्ही भयभीत होऊ नका.
- यिर्मयाह १०:३सुमारे इ.स.पू. ६०७
कारण लोकांच्या प्रथा व्यर्थ आहेत; ते जंगलातील एक लाकूड कापून आणतात, आणि एक कारागीर हातातील छेनीने त्यास आकार देतो.