circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह १०:४सुमारे इ.स.पू. ६०७
ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात; ती एका जागी स्थिर रहावी, पडू नये म्हणून खिळे व हातोडा यांनी ती ठोकून घट्ट बसवितात.
- यिर्मयाह १०:५सुमारे इ.स.पू. ६०७
ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”
- यिर्मयाह १०:६सुमारे इ.स.पू. ६०७
हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही. कारण तुम्ही महान आहात, आणि तुमचे नाव अति सामर्थ्यशाली आहे.
- यिर्मयाह १०:७सुमारे इ.स.पू. ६०७
हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे भय नाही असा कोण आहे? अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात, सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये आणि जगातील सर्व राज्यांमध्ये तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही.
- यिर्मयाह १०:८सुमारे इ.स.पू. ६०७
लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते, ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत;
- यिर्मयाह १०:९सुमारे इ.स.पू. ६०७
ते तार्शीशहून चांदीचे पत्रे आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात. मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात— हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते.
- यिर्मयाह १०:१०सुमारे इ.स.पू. ६०७
परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.
- यिर्मयाह १०:११सुमारे इ.स.पू. ६०७
“त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ”
- यिर्मयाह १०:१२सुमारे इ.स.पू. ६०७
परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.
- यिर्मयाह १०:१३सुमारे इ.स.पू. ६०७
जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.
- यिर्मयाह १०:१४सुमारे इ.स.पू. ६०७
प्रत्येक मनुष्य असमंजस व ज्ञानहीन आहे; प्रत्येक सोनार त्याच्या मूर्तींनी लज्जित झाला आहे. त्याने घडविलेल्या प्रतिमा खोट्या आहेत. त्यांच्यामध्ये श्वास नाही.
- यिर्मयाह १०:१५सुमारे इ.स.पू. ६०७
त्या व्यर्थ असून उपहासाचा विषय आहेत; जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा त्यांचा नाश होईल.
- यिर्मयाह १०:१६सुमारे इ.स.पू. ६०७
परंतु जो याकोबाचा वाटा आहे, तो यासारखा नाही. कारण तेच सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, इस्राएलसहित, ते लोक त्यांचे वारस आहेत; सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे.
- यिर्मयाह १०:१७सुमारे इ.स.पू. ६००
तुम्ही, जे वेढ्यात राहत आहात, उठा, ही भूमी सोडण्यासाठी तुमच्या सामानाची बांधाबांध करा.
- यिर्मयाह १०:१८सुमारे इ.स.पू. ६००
कारण याहवेह असे म्हणतात: “जे या देशाचे रहिवासी आहेत त्यांना यावेळी मी तुम्हाला या देशातून बाहेर भिरकावून देईन; त्यांच्यावर महासंकटे आणेन म्हणजे ते सहजगत्या पकडल्या जातील.”
- यिर्मयाह १०:१९सुमारे इ.स.पू. ६००
मला धिक्कार असो! कारण मला जखम झाली आहे! ती असाध्य आहे! तरी देखील मी स्वतःला म्हटले, “हा माझा आजार आहे आणि तो मला सहन केलाच पाहिजे.”
- यिर्मयाह १०:२०सुमारे इ.स.पू. ६००
माझा तंबू धुळीला मिळाला आहे; त्याच्या सर्व दोऱ्या तुटल्या आहेत. माझी मुले माझ्यापासून दूर गेली आहेत आणि नाहीशी झाली आहेत; माझा तंबू उभारण्यासाठी कोणीही राहिले नाही, माझे निवासस्थान पुन्हा बांधण्यास कोणीही नाही.
- यिर्मयाह १०:२१सुमारे इ.स.पू. ६००
माझे मेंढपाळ असमंजस आहेत कारण ते याहवेहचे मार्गदर्शन घेत नाहीत; म्हणून ते समृद्ध होत नाहीत आणि त्यांच्या सर्व कळपांची पांगापांग होते.
- यिर्मयाह १०:२२सुमारे इ.स.पू. ६००
ऐका! तो अहवाल येत आहे— उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे! तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल, तिथे कोल्हे भटकतील.
- यिर्मयाह १०:२३सुमारे इ.स.पू. ६००
याहवेह, मला माहीत आहे की मानवाचे जीवन त्यांच्या हातात नाही; ते स्वतःचे मार्गदर्शन करू शकत नाहीत.
- यिर्मयाह १०:२४सुमारे इ.स.पू. ६००
हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन.
- यिर्मयाह १०:२५सुमारे इ.स.पू. ६००
या राष्ट्रांवर आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करा जे तुमचा अधिकार मान्य करीत नाहीत, जे लोक तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत. त्यांनी याकोबाला गिळले आहे; त्याला संपूर्णपणे गिळंकृत केले आहे आणि त्यांच्या मातृभूमीचा नायनाट केला आहे.
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
- यिर्मयाह ११:२सुमारे इ.स.पू. ५९८
“या कराराच्या ठराविक अटी ऐकून घे व यहूदीयाचे लोक व यरुशलेममध्ये राहणारे लोक, यांना त्या सांग.
- यिर्मयाह ११:३सुमारे इ.स.पू. ५९८
त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे—