circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य— यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे; ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात. तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस.
“मी माझ्या लोकांचा त्याग करेन, माझ्या वारसांचा परित्याग करेन; माझ्या अतिप्रियजनांना मी त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.
माझे वारस माझ्याकरिता जणू वनातील सिंहिणीप्रमाणे झाले आहेत. ती माझ्यावर गर्जना करते; म्हणून मी तिचा तिरस्कार करतो.
माझे वारसदार एखाद्या ठिपकेदार पक्ष्यासारखे झाले नाहीत का, त्यांच्यावर इतर हिंस्र पक्ष्यांनी चहूबाजूंनी हल्ले चढविले नाहीत का? जा आणि त्यांना गिळंकृत करण्यासाठी सर्व वनपशूंना एकत्र कर.
अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील.
माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल.
उजाड वाळवंटाच्या टोकांवर संहार करणारे झुंडीने येतील, कारण याहवेहची तलवार भूमीला गिळून टाकेल, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणीही सुरक्षित राहणार नाही.
माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”
- यिर्मयाह १२:१४सुमारे इ.स.पू. ६०३
म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन.
- यिर्मयाह १२:१५सुमारे इ.स.पू. ६०३
परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन.
- यिर्मयाह १२:१६सुमारे इ.स.पू. ६०३
आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.
- यिर्मयाह १२:१७सुमारे इ.स.पू. ६०३
परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह १३:१सुमारे इ.स.पू. ५९९
याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.”
- यिर्मयाह १३:२सुमारे इ.स.पू. ५९९
तेव्हा याहवेहच्या सांगण्याप्रमाणे मी एक कमरबंद विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला.
- यिर्मयाह १३:३सुमारे इ.स.पू. ५९९
नंतर मला दुसऱ्यांदा याहवेहचा संदेश मिळाला:
- यिर्मयाह १३:४सुमारे इ.स.पू. ५९९
“जो कमरबंद तू विकत घेतला आणि तो कमरेस गुंडाळला, तो कमरबंद घेऊन फरात नदीवर जा आणि तिथे तो खडकांमधील एका कपारीत लपवून ठेव.”
- यिर्मयाह १३:५सुमारे इ.स.पू. ५९९
मी याहवेहने सांगितल्याप्रमाणे फरात येथे गेलो व तो लपवून ठेवला.
- यिर्मयाह १३:६सुमारे इ.स.पू. ५९९
बर्याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.”
- यिर्मयाह १३:७सुमारे इ.स.पू. ५९९
मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता.
- यिर्मयाह १३:८सुमारे इ.स.पू. ५९९
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यिर्मयाह १३:९सुमारे इ.स.पू. ५९९
“याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे.
- यिर्मयाह १३:१०सुमारे इ.स.पू. ५९९
हे दुष्ट लोक, माझी वचने ऐकण्याचे नाकारतात, आणि स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टीपणाच्या मागे जातात आणि इतर दैवतांची सेवा व आराधना करतात, ते या कमरबंदाप्रमाणे होतील—पूर्णपणे निरुपयोगी!
- यिर्मयाह १३:११सुमारे इ.स.पू. ५९९
याहवेह म्हणतात, ‘मनुष्याचा कमरबंद त्याच्या कमरेला वेढा घातलेला असतो, त्याचप्रमाणे यहूदीयाच्या सर्व लोकांना व इस्राएलच्या सर्व लोकांना मी वेढा घातला आहे, जेणेकरून त्यांनी माझ्या गौरवाचे व प्रशंसेचे व मानाचे लोक व्हावे. पण त्यांनी ऐकले नाही.’
- यिर्मयाह १३:१२सुमारे इ.स.पू. ५९९
“त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’
- यिर्मयाह १३:१३सुमारे इ.स.पू. ५९९
मग त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: या देशातील सर्व रहिवाशांना, अगदी दावीदाच्या राजासनावर बसणारा राजा, याजक व संदेष्टे यांच्यापासून ते सर्व यरुशलेमनिवासी यांना मी मदिरेने झिंगून टाकणार आहे.