circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह १३:१४सुमारे इ.स.पू. ५९९
ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”
- यिर्मयाह १३:१५सुमारे इ.स.पू. ५९९
ऐका व लक्ष द्या, उर्मट होऊ नका, कारण असे याहवेहने म्हटले आहे.
- यिर्मयाह १३:१६सुमारे इ.स.पू. ५९९
तुमच्या याहवेह परमेश्वराला गौरव द्या तुमच्यावर त्यांनी निबिड अंधार पाडण्याच्या आधी, अंधारलेल्या डोंगरावर तुमची पावले अडखळण्याआधी, तुम्ही प्रकाशाची आशा कराल, पण ते त्यास गहन अंधकारात आणि निबिड काळोखात बदलतील.
- यिर्मयाह १३:१७सुमारे इ.स.पू. ५९९
जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.
- यिर्मयाह १३:१८सुमारे इ.स.पू. ५९९
राजाला व राजमातेला सांगा, “तुमच्या राजासनावरून खाली उतरा, कारण तुमचे वैभवी मुकुट तुमच्या मस्तकांवरून पडतील.”
- यिर्मयाह १३:१९सुमारे इ.स.पू. ५९९
यहूदीयाच्या दक्षिणेकडील नेगेवप्रांतातील नगरवेशी बंद होतील, आणि त्या उघडण्यास तिथे कोणीही नसेल. संपूर्ण यहूदीयाला बंदिवासात नेण्यात येईल पूर्णपणे नेण्यात येईल.
- यिर्मयाह १३:२०सुमारे इ.स.पू. ५९९
नेत्र उंच करा व पाहा उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्यांना पाहा. ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता, विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे?
- यिर्मयाह १३:२१सुमारे इ.स.पू. ५९९
ज्यांचे संगोपन करून त्यांना आपले विशेष मित्र बनविले त्यांनाच याहवेहने तुझ्यावर सत्ता दिली, तर मग तू काय म्हणशील? तेव्हा तू प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या स्त्रीप्रमाणे तळमळणार नाही का?
- यिर्मयाह १३:२२सुमारे इ.स.पू. ५९९
“हे सर्व माझ्यावर का ओढवले?” असा प्रश्न तू जर स्वतःला विचारलास— तर तुझ्या घोर पापांमुळे हे घडत आहे तुझी वस्त्रे फाडण्यात आली तुझ्या शरीरास दुष्टतेने वागविले आहे.
- यिर्मयाह १३:२३सुमारे इ.स.पू. ५९९
कूशी मनुष्याला आपल्या त्वचेचा रंग बदलता येईल का चित्त्याला आपल्या शरीरावरील ठिपके बदलता येतील का? त्याचप्रमाणे तुला सत्कर्मे करता येत नाहीत दुष्कर्मे करण्याची तुला चटक लागली आहे.
- यिर्मयाह १३:२४सुमारे इ.स.पू. ५९९
“वार्यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी.
- यिर्मयाह १३:२५सुमारे इ.स.पू. ५९९
हाच तुझा वाटा आहे, तुला माझ्याकडून मिळावयाचा वतनभाग हाच होय,” असे याहवेह जाहीर करतात, “कारण तू मला विसरला आहेस आणि खोट्या दैवतांवर विश्वास ठेवलास.
- यिर्मयाह १३:२६सुमारे इ.स.पू. ५९९
म्हणून मी तुझी वस्त्रे वर ओढून तुझ्या चेहऱ्यावर टाकेन जेणेकरून तुझी लाज उघडी पडेल—
- यिर्मयाह १३:२७सुमारे इ.स.पू. ५९९
तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?”
- यिर्मयाह १४:१सुमारे इ.स.पू. ६०५
अनावृष्टि संबंधित खुलासा करणारा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला प्राप्त झाला.
- यिर्मयाह १४:२सुमारे इ.स.पू. ६०५
“यहूदीया विलाप करीत आहे, तिची नगरे झुरणीला लागली आहेत; ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत.
- यिर्मयाह १४:३सुमारे इ.स.पू. ६०५
त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; ते विहिरीवर जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही. ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; गोंधळून व निराश होऊन आपली डोकी झाकून घेतात.
- यिर्मयाह १४:४सुमारे इ.स.पू. ६०५
जमिनीला भेगा पडल्या आहेत कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही; शेतकरी घाबरले आहेत म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात.
- यिर्मयाह १४:५सुमारे इ.स.पू. ६०५
हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही.
- यिर्मयाह १४:६सुमारे इ.स.पू. ६०५
रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यागत धापा टाकत आहेत; अन्नाशिवाय त्यांची नजर निस्तेज झाली आहे.”
- यिर्मयाह १४:७सुमारे इ.स.पू. ६०५
जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!
- यिर्मयाह १४:८सुमारे इ.स.पू. ६०५
तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्या वाटसरूसारखे का झाला आहात?
- यिर्मयाह १४:९सुमारे इ.स.पू. ६०५
एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या वाचविण्यास अशक्त योद्ध्याप्रमाणे? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका!
- यिर्मयाह १४:१०सुमारे इ.स.पू. ६०५
यावर याहवेहने या लोकांबद्दल असे म्हटले: “माझ्यापासून दूर भटकणे त्यांना फार आवडते; ते त्यांची पावले ताब्यात ठेवत नाहीत. म्हणून याहवेह तुमचा स्वीकार करीत नाहीत; आता मी तुमची दुष्कर्मे आठवेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला शासन करेन.”
- यिर्मयाह १४:११सुमारे इ.स.पू. ६०५
मग याहवेहने मला म्हटले, “त्यांच्या भल्यासाठी इतःपर प्रार्थना करू नकोस.