circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह १४:१२सुमारे इ.स.पू. ६०५
जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.”
- यिर्मयाह १४:१३सुमारे इ.स.पू. ६०५
परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ”
- यिर्मयाह १४:१४सुमारे इ.स.पू. ६०५
त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”
- यिर्मयाह १४:१५सुमारे इ.स.पू. ६०५
म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.
- यिर्मयाह १४:१६सुमारे इ.स.पू. ६०५
आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.
- यिर्मयाह १४:१७सुमारे इ.स.पू. ६०५
“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे.
- यिर्मयाह १४:१८सुमारे इ.स.पू. ६०५
नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”
- यिर्मयाह १४:१९सुमारे इ.स.पू. ६०५
तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय? सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय? तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही? आम्ही शांतीची आशा केली होती पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही, आरोग्य मिळण्याच्या ऐवजी सर्वत्र दहशतच पसरली आहे.
- यिर्मयाह १४:२०सुमारे इ.स.पू. ६०५
हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.
- यिर्मयाह १४:२१सुमारे इ.स.पू. ६०५
तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा आणि तो मोडू नका.
- यिर्मयाह १४:२२सुमारे इ.स.पू. ६०५
या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.
- यिर्मयाह १५:१सुमारे इ.स.पू. ६०५
तेव्हा याहवेहने मला म्हटले: “जर मोशे व शमुवेल माझ्यासमोर येऊन उभे राहिले तरीसुद्धा या लोकांकरिता माझे हृदय द्रवित होणार नाही. त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालवून दे! त्यांना जाऊ दे!
- यिर्मयाह १५:२सुमारे इ.स.पू. ६०५
आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’
- यिर्मयाह १५:३सुमारे इ.स.पू. ६०५
“मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे.
- यिर्मयाह १५:४सुमारे इ.स.पू. ६०५
यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.
- यिर्मयाह १५:५सुमारे इ.स.पू. ६०५
“हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करेल? तुझ्यासाठी कोण शोक करेल? तू कसा आहे अशी विचारपूस कोण करेल?
- यिर्मयाह १५:६सुमारे इ.स.पू. ६०५
तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.
- यिर्मयाह १५:७सुमारे इ.स.पू. ६०५
मी शहरांच्या वेशींमध्येच त्यांना पाखडेन. मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही.
- यिर्मयाह १५:८सुमारे इ.स.पू. ६०५
मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,
- यिर्मयाह १५:९सुमारे इ.स.पू. ६०५
सात मुलांची माता बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडेल. भरदिवसा तिचा सूर्य मावळेल; आता ती अपमानित आणि लज्जित होऊन बसेल. त्यातून वाचलेल्यांना त्यांच्या वैर्यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन,” याहवेहने असे जाहीर करतात.
- यिर्मयाह १५:१०सुमारे इ.स.पू. ६०५
हे माझ्या आई, हाय हाय, तू मला जन्म दिला, मी या सर्व राष्ट्राच्या दृष्टीने झगडा आणि विद्रोह करणारा झालो आहे! मी कोणाही कडून कर्ज घेतलेले नाही, ना कोणी माझ्याकडून घेतलेले आहे, तरीपण प्रत्येकजण मला श्राप देतात.
- यिर्मयाह १५:११सुमारे इ.स.पू. ६०५
याहवेह म्हणाले, “चांगल्या कार्यासाठी मी निश्चितच तुझी सुटका करेन; तुझे शत्रू संकटात आणि क्लेशदायक समयी तुला विनवण्या करतील असे मी करेन.
- यिर्मयाह १५:१२सुमारे इ.स.पू. ६०५
“एखाद्या मनुष्याला लोखंड— उत्तरेकडील लोखंडाचे—किंवा कास्याचे गज मोडता येतील का?
- यिर्मयाह १५:१३सुमारे इ.स.पू. ६०५
“मी तुमची संपत्ती व तुमचा ठेवा बेमोबदला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करेन, कारण तुम्ही केलेल्या सर्व पातकांमुळे संपूर्ण देशात असे घडेल.
- यिर्मयाह १५:१४सुमारे इ.स.पू. ६०५
जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता, त्या देशात मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचे गुलाम करेन, कारण माझा क्रोध अग्नीप्रमाणे भडकला आहे, आणि तो तुम्हाला भस्म करून टाकील.”