circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ६:१६सुमारे इ.स.पू. ६१२
याहवेह असे म्हणतात: “चौरस्त्यावर उभे राहा व पाहा; पुरातन मार्गाची विचारणा करा, तो चांगला मार्ग कुठे आहे ते विचारा आणि त्या मार्गाने जा, तसे केल्यास तुमच्या आत्म्याला शांती लाभेल. परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही त्या मार्गाने चालणार नाही.’
- यिर्मयाह ६:१७सुमारे इ.स.पू. ६१२
मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले, ‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’ परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही ऐकणार नाही.’
- यिर्मयाह ६:१८सुमारे इ.स.पू. ६१२
म्हणून माझ्या राष्ट्रांनो माझे ऐका; तुम्ही माझे साक्षीदार आहात, त्यांचे काय होईल ते समजून घ्या.
- यिर्मयाह ६:१९सुमारे इ.स.पू. ६१२
हे पृथ्वी तू ऐक: मी या लोकांवर महासंकट आणत आहे, त्यांच्याच कारस्थानाचे फळ, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही आणि माझे नियम नाकारले.
- यिर्मयाह ६:२०सुमारे इ.स.पू. ६१२
शबाहून आणलेल्या सुगंधी धूपाचा मला काय उपयोग किंवा दूरदेशातील मोलाच्या द्रव्याचा काय उपयोग? तुमची होमार्पणे मला संतुष्ट करीत नाही; तुमचे यज्ञबली मला प्रसन्न करीत नाहीत.”
- यिर्मयाह ६:२१सुमारे इ.स.पू. ६१२
म्हणून याहवेह असे म्हणतात: “मी या लोकांच्या मार्गात अडथळे पाठवेन. त्यावर मातापिता आणि लेकरे सारखेच अडखळतील. शेजारी आणि मित्र नाश पावतील.”
- यिर्मयाह ६:२२सुमारे इ.स.पू. ६१२
याहवेह असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र भडकविले जात आहे.
- यिर्मयाह ६:२३सुमारे इ.स.पू. ६१२
त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.”
- यिर्मयाह ६:२४सुमारे इ.स.पू. ६१२
आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे, आणि आमचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे.
- यिर्मयाह ६:२५सुमारे इ.स.पू. ६१२
शेतातून बाहेर जाऊ नका, किंवा रस्त्यांवरून प्रवास करू नका, कारण शत्रूकडे तलवार आहे, आणि प्रत्येक बाजूला आतंक पसरलेला आहे.
- यिर्मयाह ६:२६सुमारे इ.स.पू. ६१२
माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा, आणि राखेत लोळा; एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो तसा आक्रोश कर. कारण संहारक सेना एकाएकी तुझ्यावर हल्ला करेल.
- यिर्मयाह ६:२७सुमारे इ.स.पू. ६१२
“मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे. आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू, जेणेकरून तू त्यांना पारखावे, व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी.
- यिर्मयाह ६:२८सुमारे इ.स.पू. ६१२
ते सर्व कठोर बंडखोर आहेत, निंदा करीत फिरत आहेत. ते कास्य आणि लोखंडासारखे; त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे.
- यिर्मयाह ६:२९सुमारे इ.स.पू. ६१२
भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे. शुद्ध करणारा अग्नी शिसे भस्म करीत आहे, परंतु हे शुद्धीकरण व्यर्थ होत आहे, दुष्ट मार्गानी चालणारे पूर्णपणे शुद्ध होत नाहीत.
- यिर्मयाह ६:३०सुमारे इ.स.पू. ६१२
ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत, कारण याहवेहने त्यांचा त्याग केला आहे.”
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
- यिर्मयाह ७:२सुमारे इ.स.पू. ६१०
“याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहा आणि तिथे हा संदेश जाहीर कर: “ ‘यहूदीयातील सर्व लोक जे या प्रवेशद्वारातून याहवेहची उपासना करण्यासाठी आत येतात ते लोकहो, याहवेहचे हे वचन ऐका.
- यिर्मयाह ७:३सुमारे इ.स.पू. ६१०
इस्राएलचे सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुमच्या मार्गाची व वर्तणुकीची सुधारणा करा, मग मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन.
- यिर्मयाह ७:४सुमारे इ.स.पू. ६१०
तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!”
- यिर्मयाह ७:५सुमारे इ.स.पू. ६१०
तुम्ही तुमचे मार्ग व वर्तणूक खरोखर बदलली तर व इतरांशी न्यायाने वागाल,
- यिर्मयाह ७:६सुमारे इ.स.पू. ६१०
जर तुम्ही परकीय, अनाथ आणि विधवा यांच्यावर अत्याचार करत नसाल, या ठिकाणी निष्कलंक रक्त पाडणार नसाल, आणि जे तुमच्या नाशाचे कारण असलेल्या इतर दैवतांचे अनुसरण करणार नाही,
- यिर्मयाह ७:७सुमारे इ.स.पू. ६१०
तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन.
- यिर्मयाह ७:८सुमारे इ.स.पू. ६१०
परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत.
- यिर्मयाह ७:९सुमारे इ.स.पू. ६१०
“ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून,
- यिर्मयाह ७:१०सुमारे इ.स.पू. ६१०
आणि मग येथे येऊन, ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे, त्या मंदिरात माझ्यासमोर उभे राहता व म्हणता “आम्ही सुरक्षित आहोत;” हे सर्व दुष्कृत्य करण्यासाठी सुरक्षित आहात काय?