मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४:२८सुमारे इ.स.पू. ६१२

    यास्तव पृथ्वी शोक करेल आणि आकाशात काळोख होईल, कारण मी बोललो आहे, त्यात आता बदल होणार नाही, मी निर्णय घेतला आहे आणि मागे फिरणार नाही.”

  2. यिर्मयाह ४:२९सुमारे इ.स.पू. ६१२

    घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच आवाजाने सर्व नगरे घाबरून पळतात. काही लोक झुडूपात लपून बसतात; आणि डोंगरा-पर्वतांवर चढतात. सर्व नगरे उजाड पडली आहेत; कोणीही त्यात राहत नाही.

  3. यिर्मयाह ४:३०सुमारे इ.स.पू. ६१२

    हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे? कशासाठी तू ही गडद वस्त्रे परिधान केली आहेस आणि अंगावर सोन्याचे दागिने चढविले आहेस? आपल्या डोळ्यांत काजळ घालून ते सजविले आहेस? या सर्व शृंगारांचा तुला काही एक उपयोग होणार नाही. तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात; तुला ठार करण्याची त्यांची इच्छा आहे.

  4. यिर्मयाह ४:३१सुमारे इ.स.पू. ६१२

    एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला, जणू तिला पहिल्यांदा मूल होते, अशा प्रकारचा आक्रोश— सीयोनच्या कन्येचा श्वास कोंडला आहे, ती आपले हात पसरून म्हणत आहे, “हाय रे हाय! मला मूर्च्छा येत आहे; माझा जीव मी घातक्यापुढे ठेवला आहे.”

  5. यिर्मयाह ५:१सुमारे इ.स.पू. ६१२

    “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर, शोध घे व विचार कर, तिच्या चौकात तपास कर. असा एक जरी मनुष्य आढळला जो प्रामाणिक व सत्यशोधक आहे, तरी मी या नगराला क्षमा करेन.

  6. यिर्मयाह ५:२सुमारे इ.स.पू. ६१२

    ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात पण ते ही खोटीच शपथ घेतात.”

  7. यिर्मयाह ५:३सुमारे इ.स.पू. ६१२

    हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का? तुम्ही त्यांना शिक्षा केली, पण त्यांना मुळीच वेदना झाली नाही. तुम्ही त्यांना चिरडून टाकले, पण ते आपल्या पापांपासून मागे वळण्याचे नाकारतात. आपली मुखे त्यांनी खडकासारखी कठीण केली व पश्चात्ताप न करण्याचे त्यांनी ठरविले.

  8. यिर्मयाह ५:४सुमारे इ.स.पू. ६१२

    मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.

  9. यिर्मयाह ५:५सुमारे इ.स.पू. ६१२

    मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.

  10. यिर्मयाह ५:६सुमारे इ.स.पू. ६१२

    म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.

  11. यिर्मयाह ५:७सुमारे इ.स.पू. ६१२

    “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.

  12. यिर्मयाह ५:८सुमारे इ.स.पू. ६१२

    हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत, प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीची लालसा धरतो.

  13. यिर्मयाह ५:९सुमारे इ.स.पू. ६१२

    हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?

  14. यिर्मयाह ५:१०सुमारे इ.स.पू. ६१२

    “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत.

  15. यिर्मयाह ५:११सुमारे इ.स.पू. ६१२

    इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी माझा घोर विश्वासघात केला आहे,” असे याहवेह म्हणतात.

  16. यिर्मयाह ५:१२सुमारे इ.स.पू. ६१२

    ते याहवेहबद्दल खोटे बोलतात; ते म्हणतात, “ते काहीही करणार नाहीत! आमच्यावर अरिष्ट कोसळणारच नाही; आम्ही दुष्काळ आणि लढाई बघणारही नाही.

  17. यिर्मयाह ५:१३सुमारे इ.स.पू. ६१२

    संदेष्टे निव्वळ वारा आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराचे वचन नाही. म्हणून ते जे काही बोलतात ते सर्व त्यांच्यावरच कोसळू दे.”

  18. यिर्मयाह ५:१४सुमारे इ.स.पू. ६१२

    म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “कारण या लोकांनी हे शब्द उच्चारले आहेत, मी तुमच्या मुखात माझे शब्द भडकत्या अग्नीसारखे करेन आणि जो या लोकांना सरपणाच्या लाकडांप्रमाणे जाळून भस्म करेल.”

  19. यिर्मयाह ५:१५सुमारे इ.स.पू. ६१२

    याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— त्यांची भाषा तू जाणत नाही, त्यांची वाणी तुला समजत नाही.

  20. यिर्मयाह ५:१६सुमारे इ.स.पू. ६१२

    त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांचे सर्व योद्धे प्रतापी आहेत.

  21. यिर्मयाह ५:१७सुमारे इ.स.पू. ६१२

    ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.

  22. यिर्मयाह ५:१८सुमारे इ.स.पू. ६१२

    “परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात.

  23. यिर्मयाह ५:१९सुमारे इ.स.पू. ६१२

    जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.

  24. यिर्मयाह ५:२०सुमारे इ.स.पू. ६१२

    “याकोबाच्या वंशजांना आणि यहूदीयाला हे जाहीर कर:

  25. यिर्मयाह ५:२१सुमारे इ.स.पू. ६१२

    ऐका, अहो मूर्खानो व बुद्धिहीन लोकांनो, तुम्हाला डोळे आहेत तरी तुम्हाला दिसत नाही, कान आहेत तरी तुम्हाला ऐकू येत नाही: