circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, पण तू शरमिंदी होण्यास नकार देते.
तू मला आताच म्हणालीस ना, ‘माझ्या पित्या, माझ्या तारुण्यातील मित्रा,
तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.”
- यिर्मयाह ३:६सुमारे इ.स.पू. ६१२
योशीयाह राजाच्या शासनकाळात, याहवेहने मला म्हटले, “तुम्ही पहिले का अविश्वासू इस्राएलने काय केले आहे? एखाद्या दुराचारी स्त्रीप्रमाणे प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली व्यभिचार करते.
- यिर्मयाह ३:७सुमारे इ.स.पू. ६१२
मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला.
- यिर्मयाह ३:८सुमारे इ.स.पू. ६१२
मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला.
- यिर्मयाह ३:९सुमारे इ.स.पू. ६१२
कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे.
- यिर्मयाह ३:१०सुमारे इ.स.पू. ६१२
हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह ३:११सुमारे इ.स.पू. ६१२
याहवेहने मला म्हटले, “विश्वासघातकी यहूदीयापेक्षा विश्वासहीन इस्राएल अधिक नीतिमान आहे.
- यिर्मयाह ३:१२सुमारे इ.स.पू. ६१२
उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा: “ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये, मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही, कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात ‘मी नेहमीच क्रोध करणार नाही,
- यिर्मयाह ३:१३सुमारे इ.स.पू. ६१२
केवळ तुम्ही आपली पापे स्वीकार करा— तुमचे याहवेह परमेश्वर यांच्याविरुद्ध तुम्ही बंड केले आहे, इतर परकीय दैवतांची तुम्ही उपासना केली प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली, माझे आज्ञापालन केले नाही,’ ” असे याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह ३:१४सुमारे इ.स.पू. ६१२
“विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन.
- यिर्मयाह ३:१५सुमारे इ.स.पू. ६१२
नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल.
- यिर्मयाह ३:१६सुमारे इ.स.पू. ६१२
हे त्या दिवसामध्ये होईल, जेव्हा तुम्ही देशात बहुगुणित व्हाल,” याहवेह अशी घोषणा करतात, “तेव्हा लोक असे म्हणणार नाहीत, ‘याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या मनात येणार नाही.’ ते कधीही त्यांच्या लक्षात येणार नाही, त्यांना आठवणसुद्धा राहणार नाही; ते त्याच्याविषयी पुन्हा विचार करणार नाहीत, दुसरा कोश पुन्हा निर्माण होणार नाही.
- यिर्मयाह ३:१७सुमारे इ.स.पू. ६१२
त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत.
- यिर्मयाह ३:१८सुमारे इ.स.पू. ६१२
त्या दिवसामध्ये यहूदीयाचे लोक इस्राएलच्या लोकांसोबत येतील, आणि ते लोक उत्तरेकडून एकत्र येईल. त्यांच्या पूर्वजांना मी कायमचे वतन म्हणून दिलेल्या देशात ते परत येतील.
- यिर्मयाह ३:१९सुमारे इ.स.पू. ६१२
“मी स्वतःला म्हटले, “ ‘तुम्हाला माझ्या मुलाबाळांप्रमाणे वागवितांना मला किती आनंद होईल आणि मी तुम्हाला सुखद भूमी देईन, कोणत्याही देशापेक्षा अधिक सुंदर वतन.’ मला वाटले तू मला ‘पिता’ म्हणून हाक मारशील आणि माझे अनुसरण करण्यापासून मागे फिरणार नाही.
- यिर्मयाह ३:२०सुमारे इ.स.पू. ६१२
परंतु आपल्या पतीला सोडून जाणार्या विश्वासघातकी स्त्रीसारखे तू इस्राएलाच्या घराण्या माझा विश्वासघात केला,” असे याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह ३:२१सुमारे इ.स.पू. ६१२
उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे, तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज, कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत.
- यिर्मयाह ३:२२सुमारे इ.स.पू. ६१२
“विश्वासहीन लोकांनो परत या; मी तुमच्यामागे घसरणीस बरे करेन.” “होय, आम्ही तुमच्याकडे येऊ, कारण तुम्हीच आमचे परमेश्वर याहवेह आहात.
- यिर्मयाह ३:२३सुमारे इ.स.पू. ६१२
निश्चितच डोंगरावरील गोंधळ व पर्वतावरील फसवणूक; निश्चितच आमचे परमेश्वर याहवेह हेच इस्राएलचे तारण आहेत.
- यिर्मयाह ३:२४सुमारे इ.स.पू. ६१२
आमच्या तारुण्यापासून लाजिरवाण्या दैवतांनी आमच्या पूर्वजांच्या कष्टाची फळे— त्यांच्या जनावरांचे थवे व कळप, त्यांचे पुत्र आणि कन्या गिळंकृत केले आहेत.
- यिर्मयाह ३:२५सुमारे इ.स.पू. ६१२
आम्ही लज्जास्पद अवस्थेत लोळू आमची विटंबना आम्हाला झाकून टाको. आम्ही आमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी; तारुण्यापासून आजपर्यंत आमच्या याहवेह परमेश्वराची आज्ञा आम्ही पाळली नाही.”
- यिर्मयाह ४:१सुमारे इ.स.पू. ६१२
याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,” “मग माझ्याकडे परत ये.” “जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही,
- यिर्मयाह ४:२सुमारे इ.स.पू. ६१२
आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील, ‘जिवंत याहवेहची शपथ वाहशील,’ तर मग राष्ट्रे याहवेहच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि याहवेहच्या नामामध्ये त्यांचा गौरव करतील.”