मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह २:१५सुमारे इ.स.पू. ६२९

    सिंहगर्जना करतात; त्यांनी त्यांच्यावर मोठ्याने गर्जना केली. त्यांनी त्यांची भूमी उद्ध्वस्त केली; त्यांची गावे जाळली व वैराण केली आहेत.

  2. यिर्मयाह २:१६सुमारे इ.स.पू. ६२९

    मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे.

  3. यिर्मयाह २:१७सुमारे इ.स.पू. ६२९

    ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?

  4. यिर्मयाह २:१८सुमारे इ.स.पू. ६२९

    आता इजिप्तकडे कशाला जाता नील नदीचे पाणी पिण्यासाठी काय? आणि अश्शूराकडे का जावे फरात नदीचे पाणी पिण्यासाठी काय?

  5. यिर्मयाह २:१९सुमारे इ.स.पू. ६२९

    तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल; तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल. म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे, आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,” सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.

  6. यिर्मयाह २:२०सुमारे इ.स.पू. ६२९

    “फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले व मी बांधलेले दावे तोडून टाकले; तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’ अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर, आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात.

  7. यिर्मयाह २:२१सुमारे इ.स.पू. ६२९

    मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते. मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात भ्रष्ट व रानटी लता का झालात?

  8. यिर्मयाह २:२२सुमारे इ.स.पू. ६२९

    तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.

  9. यिर्मयाह २:२३सुमारे इ.स.पू. ६२९

    “तुम्हाला कसे म्हणता येईल ‘मी अशुद्ध नाही; मी बआल दैवताच्या मागे गेलो नाही’? दरीत जाऊन तुम्ही कसे वागले ते पाहा, तुमच्या आचरणाबद्धल विचार करा. इकडे तिकडे पळणार्‍या चपळ उंटिणीसारखे तुम्ही आहात.

  10. यिर्मयाह २:२४सुमारे इ.स.पू. ६२९

    वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; संभोगासमयी त्यांना ती सापडेल.

  11. यिर्मयाह २:२५सुमारे इ.स.पू. ६२९

    तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’

  12. यिर्मयाह २:२६सुमारे इ.स.पू. ६२९

    “चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.

  13. यिर्मयाह २:२७सुमारे इ.स.पू. ६२९

    लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’ आणि पाषाणाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे, पण त्यांचे मुख नव्हे; परंतु संकट समय येताच ते माझा धावा करून म्हणतात, ‘या आणि आमचे रक्षण करा!’

  14. यिर्मयाह २:२८सुमारे इ.स.पू. ६२९

    तुम्ही स्वतःसाठी निर्माण केलेली दैवते कुठे आहेत? जर ते तुमचे रक्षण करू शकतील, तर त्यांनी यावे तुमच्या संकटसमयी यावे! तुम्ही यहूदीया, तुमच्या दैवतांची संख्या इतकी आहे जेवढी नगरे तुमच्या प्रांतात आहेत.

  15. यिर्मयाह २:२९सुमारे इ.स.पू. ६२९

    “तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता? तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,” असे याहवेह म्हणतात.

  16. यिर्मयाह २:३०सुमारे इ.स.पू. ६२९

    “मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली; त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही. तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला जणू एखादा खवखवलेला सिंहच.

  17. यिर्मयाह २:३१सुमारे इ.स.पू. ६२९

    “या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा: “मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय? माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत; आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’?

  18. यिर्मयाह २:३२सुमारे इ.स.पू. ६२९

    एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा एखादी वधू आपली विवाहाभूषणे विसरेल का? तरी माझे लोक मला, असंख्य दिवसापासून विसरले आहेत.

  19. यिर्मयाह २:३३सुमारे इ.स.पू. ६२९

    तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात! अत्यंत चरित्रहीन स्त्रियांनाही तुमच्यापासून धडे शिकता येतील.

  20. यिर्मयाह २:३४सुमारे इ.स.पू. ६२९

    निष्पाप लोकांच्या रक्ताने तुमची वस्त्रे माखली आहेत, तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही. असे सर्व असूनही

  21. यिर्मयाह २:३५सुमारे इ.स.पू. ६२९

    तुम्ही म्हणता, ‘मी निर्दोष आहे; परमेश्वर माझ्यावर रागावले नाहीत.’ परंतु मी तुमचा न्याय करेन कारण तुम्ही म्हटले, ‘मी पाप केलेले नाही.’

  22. यिर्मयाह २:३६सुमारे इ.स.पू. ६२९

    तुम्ही आपले मार्ग सोडून पथभ्रष्ट का होता? अश्शूरने तुमचा आशाभंग केला तसाच इजिप्तही करेल.

  23. यिर्मयाह २:३७सुमारे इ.स.पू. ६२९

    तुम्हीही आपले स्थान सोडणार आपले हात डोक्यावर ठेऊन जाल, कारण ज्यांच्यावर तुमचा भरवसा आहे, त्यांनाच याहवेहने नाकारले आहे. ते तुम्हाला मदत करणारच नाहीत.

  24. “जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.

  25. “उजाड टेकडीकडे आपली दृष्टी कर व पाहा. असे कोणते स्थान आहे जिथे तुझ्यासह कुकर्म केले गेले नाही? रस्त्याच्या कडेला तू आपल्या प्रियकरांची वाट बघतेस, एखाद्या अरबीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखी बसून राहतेस. आपल्या कुकर्माने व जारकर्माने तू सर्व भूमी दूषित केली आहेस.