मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यिर्मयाह ४:३सुमारे इ.स.पू. ६१२

    यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात: “तुमची कठीण भूमीवर नांगरून घ्या, काट्यांमध्ये बीजारोपण करू नका.

  2. यिर्मयाह ४:४सुमारे इ.स.पू. ६१२

    अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो याहवेहसाठी तुमची सुंता करा, तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल कारण तुम्ही पापे केली आहेत— तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.”

  3. यिर्मयाह ४:५सुमारे इ.स.पू. ६१२

    “यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा: ‘संपूर्ण राष्ट्रांत रणशिंगे फुंका!’ मोठ्याने ओरडून सांगा: ‘सर्वजण एकत्र या! तटबंदीच्या नगरात शरण घ्या!’

  4. यिर्मयाह ४:६सुमारे इ.स.पू. ६१२

    सीयोनच्या दिशेने ध्वजेचा संकेत करा! विलंब न करता सुरक्षित ठिकाणी पळ काढा! कारण मी उत्तरेकडून महान संकट आणत आहे, होय, एक भयानक विनाश.”

  5. यिर्मयाह ४:७सुमारे इ.स.पू. ६१२

    सिंह आपल्या गुहेतून बाहेर पडला आहे; राष्ट्रांचा विनाशक आलेला आहे. त्याने आपले निवास सोडले आहे. तुमच्या भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी. तुमची नगरे उजाड होतील आणि निर्जन होतील.

  6. यिर्मयाह ४:८सुमारे इ.स.पू. ६१२

    म्हणून आपल्या अंगावर गोणपाट वेष चढवा, शोक व आक्रोश करा. कारण याहवेहचा महाभयंकर क्रोध अजून आमच्यावरून शमलेला नाही.

  7. यिर्मयाह ४:९सुमारे इ.स.पू. ६१२

    याहवेह असे म्हणतात, “त्या दिवशी असे घडेल,” “राजा आणि अधिकारी भीतीने गर्भगळीत होतील, याजकांना भयाने धडकी भरेल आणि संदेष्टे भीतीने गांगरून जातील,”

  8. यिर्मयाह ४:१०सुमारे इ.स.पू. ६१२

    त्यावर मी म्हटले, “परंतु हे सार्वभौम याहवेह! तुम्ही यरुशलेमातील लोकांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे, असे म्हणून ‘तुम्हाला शांती लाभेल,’ पण आम्हाला जिवे मारण्यासाठी तलवार गळ्यावर उगारली आहे!”

  9. यिर्मयाह ४:११सुमारे इ.स.पू. ६१२

    त्यावेळी या लोकांना व यरुशलेमला सांगितल्या जाईल, “वाळवंटातील उजाड टेकड्यांवरून दाहक वारा माझ्या लोकांकडे येईल, परंतु पाखडणे किंवा स्वच्छ करण्यासाठी नाही.

  10. यिर्मयाह ४:१२सुमारे इ.स.पू. ६१२

    तो झंझावाती वारा माझ्याकडून येईल. आता मी त्यांच्याविरुद्ध माझा न्याय जाहीर करेन.”

  11. यिर्मयाह ४:१३सुमारे इ.स.पू. ६१२

    पाहा! तो ढगांसारखा पुढे येत आहे, चक्रीवादळाप्रमाणे त्याचे रथ आहेत, त्यांच्या घोड्यांचा वेग गरुडांहून जास्त आहे. हाय! हाय! आमचा नायनाट झाला आहे!

  12. यिर्मयाह ४:१४सुमारे इ.स.पू. ६१२

    यरुशलेम, तुमच्या अंतःकरणाची अशुद्धता स्वच्छ करा आणि तुमचे रक्षण होईल. किती काळ तुम्ही तुमचे दुष्ट विचार अंतःकरणात ठेवणार?

  13. यिर्मयाह ४:१५सुमारे इ.स.पू. ६१२

    दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे.

  14. यिर्मयाह ४:१६सुमारे इ.स.पू. ६१२

    “राष्ट्रांना सांगा, यरुशलेमविषयी घोषणा करा: ‘शहराला वेढा घालण्यासाठी दूर देशाचे सैन्य येत आहे, यहूदीयाच्या शहराविरुद्ध रणगर्जना करीत आहेत.

  15. यिर्मयाह ४:१७सुमारे इ.स.पू. ६१२

    त्यांनी तिला एखाद्या शेताच्या राखणदारांसारखे घेरले आहे, कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केले आहे,’ ” असे याहवेह म्हणतात.

  16. यिर्मयाह ४:१८सुमारे इ.स.पू. ६१२

    “तुमच्या वागणुकीमुळे व वाईट कृत्यामुळे हा प्रसंग तुम्ही स्वतःवर ओढवून घेतला आहे. तुमची ही शिक्षा आहे! किती कडू आहे हे! कसे अंतःकरण छेदून टाकले आहे!”

  17. यिर्मयाह ४:१९सुमारे इ.स.पू. ६१२

    अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! मला अत्यंत वेदना होत आहेत. अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, मी शांत राहू शकत नाही. कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.

  18. यिर्मयाह ४:२०सुमारे इ.स.पू. ६१२

    एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते; सर्व राष्ट्र उद्ध्वस्त झाले आहे. माझा तंबूचा एका क्षणात नाश झाला आहे, क्षणार्धात माझे निवासस्थान जमीनदोस्त झाले आहे.

  19. यिर्मयाह ४:२१सुमारे इ.स.पू. ६१२

    किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार?

  20. यिर्मयाह ४:२२सुमारे इ.स.पू. ६१२

    “माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”

  21. यिर्मयाह ४:२३सुमारे इ.स.पू. ६१२

    मी पृथ्वीकडे पाहिले, आणि ती निराकार आणि रिकामी होती; आणि आकाशाकडे दृष्टी केली आणि तेथील प्रकाश नाहीसा झाला होता.

  22. यिर्मयाह ४:२४सुमारे इ.स.पू. ६१२

    मी पर्वतांकडे पाहिले, ते कंपायमान झालेले होते; सर्व डोंगर डळमळत होते.

  23. यिर्मयाह ४:२५सुमारे इ.स.पू. ६१२

    मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता; आकाशातील सर्व पक्षी उडून गेलेले होते.

  24. यिर्मयाह ४:२६सुमारे इ.स.पू. ६१२

    सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती; आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे.

  25. यिर्मयाह ४:२७सुमारे इ.स.पू. ६१२

    याहवेह असे म्हणतात: “संपूर्ण भूमी उजाड होईल, तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही.