circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह ५:२२सुमारे इ.स.पू. ६१२
तुम्ही माझे भय बाळगू नये काय?” असे याहवेह विचारतात. “माझ्या उपस्थितीत तुम्ही थरथर कापू नये काय? सागराच्या सीमारेषा वाळूने मर्यादित मीच केल्या आहेत, एक अनंतकाळची मर्यादा जी ओलांडता येत नाही, म्हणूनच सागर कितीही उसळले, तरी ते विजयी होऊ शकत नाही; त्यांनी कितीही गर्जना केल्या, तरी या सीमांचे त्यांना उल्लंघन करता येत नाही.
- यिर्मयाह ५:२३सुमारे इ.स.पू. ६१२
परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत; माझ्याकडे पाठ फिरवून ते पथभ्रष्ट झाले आहेत.
- यिर्मयाह ५:२४सुमारे इ.स.पू. ६१२
ते स्वतःस असे म्हणत नाहीत, ‘आपण आपल्या याहवेह परमेश्वराचे भय धरू, जे आपल्याला प्रत्येक वर्षी वसंतॠतूत, हिवाळ्यात पाऊस देतात, जे आपल्याला निश्चित वेळेवर पीक देतात.’
- यिर्मयाह ५:२५सुमारे इ.स.पू. ६१२
तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात; तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात.
- यिर्मयाह ५:२६सुमारे इ.स.पू. ६१२
“माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत शिकारी जसा आडोशाला दबा धरून पक्षांची वाट बघतो, तसे ते माणसांना पकडण्यासाठी सापळे लावतात.
- यिर्मयाह ५:२७सुमारे इ.स.पू. ६१२
पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे, तशी त्यांची घरे कपटाने भरलेली आहेत, म्हणून आता ते बलवान व श्रीमंत बनले आहेत.
- यिर्मयाह ५:२८सुमारे इ.स.पू. ६१२
ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत. त्यांच्या दुष्कर्मांना मर्यादाच नाही; ते न्याय करीत नाहीत. अनाथांच्या न्यायाचा पाठपुरावा करीत नाहीत; आणि गरिबांच्या रास्त हक्काचे समर्थन करत नाहीत.
- यिर्मयाह ५:२९सुमारे इ.स.पू. ६१२
मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का?
- यिर्मयाह ५:३०सुमारे इ.स.पू. ६१२
“या देशात एक महाभयंकर व धक्कादायक गोष्ट घडली आहे:
- यिर्मयाह ५:३१सुमारे इ.स.पू. ६१२
संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?
- यिर्मयाह ६:१सुमारे इ.स.पू. ६१२
“बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा! यरुशलेममधून पळून जा! तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या! कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे, भयंकर विनाश.
- यिर्मयाह ६:२सुमारे इ.स.पू. ६१२
सीयोनाच्या सुंदर आणि सुकुमार कन्येला मी उद्ध्वस्त करेन.
- यिर्मयाह ६:३सुमारे इ.स.पू. ६१२
मेंढपाळ त्यांचे कळप सोबत घेऊन तिच्याविरुद्ध येतील; ते तिच्या नगराभोवती त्यांचे तंबू ठोकतील, प्रत्येक कळपासाठी कुरणे विभागतील.”
- यिर्मयाह ६:४सुमारे इ.स.पू. ६१२
“तिच्याविरुद्ध युद्धाची तयारी करा! उठा, चला दुपारच्या वेळी हल्ला करू! हाय हाय! परंतु आता दिवसाचा प्रकाश मंदावला आहे. आणि संध्याकाळची छाया लांब वाढत आहे.
- यिर्मयाह ६:५सुमारे इ.स.पू. ६१२
चला, आता आपण रात्री हल्ला चढवू आणि तिच्या गडांचा नाश करू!”
- यिर्मयाह ६:६सुमारे इ.स.पू. ६१२
कारण सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “झाडे तोडून टाका आणि यरुशलेममध्ये तटबंदीची बांधणी करा. या नगराला शिक्षा झालीच पाहिजे; तिच्यात जुलूम भरलेला आहे.
- यिर्मयाह ६:७सुमारे इ.स.पू. ६१२
ज्याप्रमाणे विहिरीच्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहते, तशी तिची दुष्टाई झर्याप्रमाणे उफाळून येते. तिच्या रस्त्यारस्त्यातून हिंसाचार व विनाशाचे आवाज घुमतात; तिचे रोग व तिच्या जखमा सदोदित माझ्या नजरेसमोर आहेत.
- यिर्मयाह ६:८सुमारे इ.स.पू. ६१२
हे यरुशलेम, तुला हा इशारा आहे. नाही तर मी तुझ्यापासून दूर होईन आणि मी तुझ्या देशाला उजाड करेन जिथे कोणीही मनुष्य राहणार नाही.”
- यिर्मयाह ६:९सुमारे इ.स.पू. ६१२
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ज्या प्रकारे उरलेले थोडेथोडे द्राक्ष गोळा करण्यात येतात त्याचप्रमाणे इस्राएलमधून थोड्याफार उरलेल्या निवडक लोकांना एकत्र करण्यात येईल; ज्या प्रकारे द्राक्ष गोळा करण्यात येतात, त्याप्रकारे तुमचे हात पुन्हा फांद्यांवरून फिरवा.”
- यिर्मयाह ६:१०सुमारे इ.स.पू. ६१२
मी कोणाशी बोलू व सावधगिरीचा इशारा देऊ? माझे कोण ऐकेल? त्यांचे कान बंद झाले आहेत त्यांना ऐकूच येत नाही. याहवेहचे वचन त्यांना संतप्त करते; त्यांना ते सुखद वाटत नाही.
- यिर्मयाह ६:११सुमारे इ.स.पू. ६१२
परंतु मी याहवेहच्या क्रोधाने भडकलो आहे, हा क्रोध मला आवरून धरवत नाही. “मी हा क्रोध रस्तोरस्ती असलेल्या मुलांवर आणि तरुणांच्या गटांवर ओततो; दोघे पतिपत्नी त्यात अडकले जातील, आणि वयस्कर, जे वयातीत आहेत ते देखील.
- यिर्मयाह ६:१२सुमारे इ.स.पू. ६१२
त्यांची घरे दुसऱ्यांना देण्यात येतील, ते त्यांची शेते व त्यांच्या स्त्रियाही इतरांना दिल्या जातील, जेव्हा माझा हात मी या देशात राहणाऱ्या लोकांविरुद्ध उगारेन, तेव्हा हे घडेल,” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह ६:१३सुमारे इ.स.पू. ६१२
“त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लोभी आहेत; संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, कपटी व्यवहार करतात.
- यिर्मयाह ६:१४सुमारे इ.स.पू. ६१२
माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात की जणू ते फारसे गंभीर नाही. ‘शांती, शांती आहे’ असे ते म्हणतात, परंतु शांती कुठेही नाही.
- यिर्मयाह ६:१५सुमारे इ.स.पू. ६१२
त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; मी जेव्हा त्यांना शिक्षा देईल तेव्हा त्यांचे पतन होईल,” असे याहवेह म्हणतात.