circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यिर्मयाह १:९सुमारे इ.स.पू. ६२९
तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे.
- यिर्मयाह १:१०सुमारे इ.स.पू. ६२९
पाहा, आज मी तुझी काही राष्ट्रे आणि राज्ये उपटून टाकण्यासाठी, काहींचा नाश करण्यासाठी, तर काहींची स्थापना, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांच्यावर तुझी नेमणूक करीत आहे.”
- यिर्मयाह १:११सुमारे इ.स.पू. ६२९
याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “यिर्मयाह, तुला काय दिसते?” तेव्हा मी उत्तर दिले, “मला बदाम वृक्षाची फांदी दिसते.”
- यिर्मयाह १:१२सुमारे इ.स.पू. ६२९
याहवेहनी मला म्हटले, “तुला योग्य दिसले, अगदी बरोबर सांगितलेस, मी आपले वचन पूर्ण झालेले पाहत आहे.”
- यिर्मयाह १:१३सुमारे इ.स.पू. ६२९
याहवेहचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले: “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उकळत्या पाण्याचे एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडून आमच्या दिशेने तिरपे झालेले आहे.”
- यिर्मयाह १:१४सुमारे इ.स.पू. ६२९
याहवेह मला म्हणाले, “या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांवर उत्तरेकडून संकट येऊन पडेल.
- यिर्मयाह १:१५सुमारे इ.स.पू. ६२९
मी उत्तरेकडील राष्ट्रांच्या सर्व लोकांना आवाहन केले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “त्यांचे राजे येतील व त्यांची सिंहासने यरुशलेमच्या प्रवेश व्दारावर स्थापतील. ते तटाच्या सर्व बाजूला व यहूदीयाच्या सर्व नगरांविरुद्ध येतील.
- यिर्मयाह १:१६सुमारे इ.स.पू. ६२९
मी माझ्या लोकांविरुद्ध माझ्या न्यायाची घोषणा करेन, कारण त्यांनी माझा त्याग करण्याचे वाईट कृत्य केले आहे. इतर दैवतांच्या मूर्तीला धूप जाळला व स्वतःच्या हस्तकृतींची पूजा केली आहे.
- यिर्मयाह १:१७सुमारे इ.स.पू. ६२९
“तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन.
- यिर्मयाह १:१८सुमारे इ.स.पू. ६२९
आज मी तुला तटबंदीचे नगर केले आहे, या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध उभे राहण्यासाठी लोहस्तंभासारखे व भक्कम कास्य दरवाजांसारखे केले आहे—यहूदीयाचे राजे, त्यांचे अधिकारी, याजक आणि लोक या सर्वांविरुद्धच.
- यिर्मयाह १:१९सुमारे इ.स.पू. ६२९
ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात.
- यिर्मयाह २:१सुमारे इ.स.पू. ६२९
तेव्हा याहवेहचे वचन मला प्राप्त झाले:
- यिर्मयाह २:२सुमारे इ.स.पू. ६२९
“जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर: “याहवेह असे म्हणतात: “ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली. आणि रानात व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.
- यिर्मयाह २:३सुमारे इ.स.पू. ६२९
इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते; त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते. ज्यांनी त्यांचा नाश केला, त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ” असे याहवेह जाहीर करतात.
- यिर्मयाह २:४सुमारे इ.स.पू. ६२९
याकोबाचे वंशजा, याहवेहचे वचन ऐका, सर्व इस्राएली कुळांनो तुम्ही सुद्धा.
- यिर्मयाह २:५सुमारे इ.स.पू. ६२९
याहवेह असे म्हणतात: “तुमच्या पूर्वजांना माझ्याठायी असा कोणता अन्याय दिसला की ते माझ्यापासून इतके दूर गेले? आणि ते व्यर्थ मूर्तींना अनुसरू लागले, आणि स्वतःही तसेच निरुपयोगी बनले?
- यिर्मयाह २:६सुमारे इ.स.पू. ६२९
त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’
- यिर्मयाह २:७सुमारे इ.स.पू. ६२९
मी तुम्हाला एका सुपीक भूमीवर घेऊन आलो, तिची उपज आणि तिचे उत्तमोत्तम पदार्थ खाण्यासाठी आणले. परंतु तुम्ही ती भूमी अशुद्ध केली आणि माझे वतन अमंगळ केले.
- यिर्मयाह २:८सुमारे इ.स.पू. ६२९
याजकांनी विचारले नाही, ‘याहवेह कुठे आहेत?’ नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती; त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे. संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले, आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले.
- यिर्मयाह २:९सुमारे इ.स.पू. ६२९
“यास्तव मी तुमच्याविरुद्ध आरोप करणार आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “आणि मी तुमच्या मुलांच्या मुलांवरही आरोप लावणार.
- यिर्मयाह २:१०सुमारे इ.स.पू. ६२९
समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:
- यिर्मयाह २:११सुमारे इ.स.पू. ६२९
कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय? (जरी ते सर्व देव नाहीतच.) परंतु माझ्या लोकांनी आपल्या गौरवी परमेश्वराची व्यर्थ मूर्तींशी अदलाबदल केली.
- यिर्मयाह २:१२सुमारे इ.स.पू. ६२९
हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा आणि भीतीने गर्भगळीत व्हा,” अशी याहवेह घोषणा करतात.
- यिर्मयाह २:१३सुमारे इ.स.पू. ६२९
“माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत: त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्याला, म्हणजे मला, सोडले आहे, आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.
- यिर्मयाह २:१४सुमारे इ.स.पू. ६२९
जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का? मग ते सगळ्यांची लूट का झाले आहेत?