circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ६५:८सुमारे इ.स.पू. ६९८
याहवेह असे म्हणतात: “कारण द्राक्षांच्या घोसात थोडाफार रस शिल्लक असतो आणि लोक म्हणतात, ‘यांचा नाश करू नका, त्यात अजूनही आशीर्वाद बाकी आहे,’ त्याप्रमाणे मी माझ्या सेवकांप्रीत्यर्थ करेन; मी त्या सर्वांचा नाश करणार नाही.
- यशायाह ६५:९सुमारे इ.स.पू. ६९८
मी याकोबाचे वंशज पुढे आणेन, आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील; माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील, व तिथे माझे सेवक वसती करतील.
- यशायाह ६५:१०सुमारे इ.स.पू. ६९८
माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.
- यशायाह ६५:११सुमारे इ.स.पू. ६९८
“पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता, जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता,
- यशायाह ६५:१२सुमारे इ.स.पू. ६९८
तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन, आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल; कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.”
- यशायाह ६५:१३सुमारे इ.स.पू. ६९८
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “माझ्या सेवकांना अन्न मिळेल, पण तुम्ही उपाशी राहाल; माझ्या सेवकांना पेय मिळेल, पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल. माझे सेवक हर्षोल्हास करतील, पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल.
- यशायाह ६५:१४सुमारे इ.स.पू. ६९८
त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्या आनंदाने माझे सेवक गाणी गातील, पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल आणि भग्नहृदयी होऊन हृदयाच्या वेदनेने आकांत कराल.
- यशायाह ६५:१५सुमारे इ.स.पू. ६९८
माझ्या निवडलेल्या लोकांमध्ये तुमचे नाव शापवचन असे होईल; सार्वभौम याहवेह तुम्हाला ठार करतील, परंतु आपल्या सेवकांना नवीन नावाने संबोधतील.
- यशायाह ६५:१६सुमारे इ.स.पू. ६९८
जो कोणी या भूमीवर आशीर्वादासाठी धावा करतो तो खऱ्या परमेश्वराद्वारेच करेल; जो कोणी या भूमीवर शपथ घेतो तो खऱ्या परमेश्वराचीच घेईल. कारण जुने त्रास विसरण्यात येतील, आणि माझ्या नजरेपासून लपविल्या जातील.
- यशायाह ६५:१७सुमारे इ.स.पू. ६९८
“कारण पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन. पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही, मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही.
- यशायाह ६५:१८सुमारे इ.स.पू. ६९८
परंतु मी जी निर्मिती करेन त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा. कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन.
- यशायाह ६५:१९सुमारे इ.स.पू. ६९८
मी यरुशलेमसाठी आनंद करेन आणि माझे लोक मला आनंददायी होतील; यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी कधीही कानांवर पडणार नाही.
- यशायाह ६५:२०सुमारे इ.स.पू. ६९८
“यापुढे तान्ही बाळे कधीही मृत्युमुखी पडणार नाहीत. आणि वयातीत मनुष्य त्याची पूर्ण वर्षे जगेल; यापुढे शंभर वर्षाचा मनुष्य मृत झाल्यास तो किती बालवयातच मृत झाला असे म्हणण्यात येईल; जो कोणी त्याची शंभरी पार न करता मृत झाल्यास तो शापित समजल्या जाईल.
- यशायाह ६५:२१सुमारे इ.स.पू. ६९८
त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील.
- यशायाह ६५:२२सुमारे इ.स.पू. ६९८
त्यांनी घरे बांधावी आणि इतरजण त्यात येऊन राहतील, किंवा ते पेरतील आणि इतरजण खातील, असे आता कदापि होणार नाही, कारण जितका जीवनकाल वृक्षाचा असेल, तसेच माझे लोक दीर्घायुषी होतील; माझे निवडलेले लोक त्यांच्या हाताने मिळविलेले प्रतिफळ सुखाने बहुतकाळ उपभोगतील.
- यशायाह ६५:२३सुमारे इ.स.पू. ६९८
त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, त्यांची मुले दुर्दैवास सामोरी जाण्यासाठी जन्मणार नाहीत. कारण ते लोक आणि त्यांचे वंशज याहवेहने आशीर्वादित लोक असे होतील.
- यशायाह ६५:२४सुमारे इ.स.पू. ६९८
मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन; ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन.
- यशायाह ६५:२५सुमारे इ.स.पू. ६९८
लांडगा व कोकरू एकत्र चरतील. सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल. माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,” असे याहवेह म्हणतात.
- यशायाह ६६:१सुमारे इ.स.पू. ६९८
याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?
- यशायाह ६६:२सुमारे इ.स.पू. ६९८
माझ्या हाताने हे सर्व घडवले आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?” अशी याहवेह घोषणा करतात. “ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात: जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत, आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात.
- यशायाह ६६:३सुमारे इ.स.पू. ६९८
परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो, त्याने ते अर्पण नरबली देण्यासारखेच असते, जो कोणी वेदीवर कोकर्याचे होमार्पण करतो तो अशा व्यक्तीसारखा आहे, जो कुत्र्याची मान मोडतो; जो कोणी अन्नार्पण करतो, तो डुकराचे रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे, आणि जो कोणी स्मरणार्थ धूप जाळतो तो एखाद्या मूर्तिपूजकासारखा आहे. त्यांनी आपले मार्ग निवडले आहेत, ते त्यांच्या घृणास्पद गोष्टी करण्यामध्ये धन्यता मानतात;
- यशायाह ६६:४सुमारे इ.स.पू. ६९८
म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे ज्याची त्यांना धास्ती वाटते, तेच मी त्यांच्यावर पाठवेन. कारण मी जेव्हा त्यांना हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही, मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्यासमक्ष दुष्कृत्ये केली आणि मला वीट आणणार्या गोष्टी करणे निवडले.”
- यशायाह ६६:५सुमारे इ.स.पू. ६९८
याहवेहची वचने ऐकून कंपित होणार्या लोकांनो, याहवेहची वचने ऐका: “तुमचे भाऊबंद जे तुमचा द्वेष करतात, आणि माझ्या नामाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तुम्हाला वाळीत टाकतात, ते थट्टेने म्हणतात, ‘याहवेहचा गौरव असो, जेणेकरून, आम्ही तुमचा हर्षोल्हास बघू!’ पण ते फजीत केले जातील.
- यशायाह ६६:६सुमारे इ.स.पू. ६९८
शहरामध्ये चाललेला आरडाओरडा ऐका, मंदिरातून येणारा गलबला ऐका! आपल्या शत्रूंची यथायोग्य परतफेड करणाऱ्या याहवेहचा हा ध्वनी आहे.
- यशायाह ६६:७सुमारे इ.स.पू. ६९८
“प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच तिची प्रसूती होईल; वेणा येण्यापूर्वीच ती पुत्र प्रसवेल.