मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ६२:१सुमारे इ.स.पू. ६९८

    सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, मी निःशब्द राहणार नाही, व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, मी शांत राहणार नाही.

  2. यशायाह ६२:२सुमारे इ.स.पू. ६९८

    राष्ट्रे तुझा निर्दोषपणा, आणि सर्व राजे तुझे वैभव बघतील; याहवेहच्या मुखाने बहाल केलेल्या नवीन नावाने तुला संबोधण्यात येईल.

  3. यशायाह ६२:३सुमारे इ.स.पू. ६९८

    तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील.

  4. यशायाह ६२:४सुमारे इ.स.पू. ६९८

    यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत, अथवा तुझ्या भूमीला ओसाड असे म्हणणार नाही. पण हेफसीबा हे तुझे नवे नाव असेल आणि तुझ्या भूमीला बिऊला म्हणतील; कारण याहवेहला तुझ्यामुळे आनंद होईल, आणि तुझी भूमी विवाहित होईल.

  5. यशायाह ६२:५सुमारे इ.स.पू. ६९८

    जसा एक तरुण एका तरुणीशी विवाह करतो, तसाच तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करेल; जसा एखाद्या वराला आपल्या वधूविषयी आनंद होतो, तसाच तुझ्या परमेश्वराला तुझ्यामुळे आनंद होईल.

  6. यशायाह ६२:६सुमारे इ.स.पू. ६९८

    अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको,

  7. यशायाह ६२:७सुमारे इ.स.पू. ६९८

    आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको.

  8. यशायाह ६२:८सुमारे इ.स.पू. ६९८

    आपल्या उजव्या हाताने आणि त्यांच्या सामर्थ्यशाली भुजेने याहवेहने शपथ वाहिली आहे: “यापुढे मी कधीही तुझे धान्य, त्यांचे अन्न म्हणून तुझ्या शत्रूंच्या स्वाधीन करणार नाही, आणि तू परिश्रम करून काढलेला नवा द्राक्षारस, परकीय येऊन कधीही पिणार नाहीत.

  9. यशायाह ६२:९सुमारे इ.स.पू. ६९८

    परंतु जे पीक काढतील, तेच ते खाईल आणि याहवेहची स्तुती करतील, आणि जे द्राक्ष गोळा करतील, तेच पवित्रस्थानाच्या आवारात द्राक्षारस पितील.”

  10. यशायाह ६२:१०सुमारे इ.स.पू. ६९८

    बाहेर पडा! वेशींच्या बाहेर पडा! माझ्या लोकांसाठी मार्ग तयार करा. बांधा, महामार्ग बांधा! दगडधोंडे काढून टाका. राष्ट्रांकरिता ध्वज उंच फडकवा.

  11. यशायाह ६२:११सुमारे इ.स.पू. ६९८

    याहवेहनी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत घोषणा केली आहे: “सीयोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझे उद्धारकर्ता येत आहेत! पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याकडे आहे, आणि त्यांची भरपाई त्यांच्यासोबत आहे.’ ”

  12. यशायाह ६२:१२सुमारे इ.स.पू. ६९८

    त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील.

  13. यशायाह ६३:१सुमारे इ.स.पू. ६९८

    एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

  14. यशायाह ६३:२सुमारे इ.स.पू. ६९८

    तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्‍यांसारखी लाल रंगाची का आहेत?

  15. यशायाह ६३:३सुमारे इ.स.पू. ६९८

    “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले; राष्ट्रातून माझ्यासोबत कोणी नव्हते. माझ्या क्रोधाने मी ती तुडविली आणि त्यांना आपल्या संतापाने चिरडले; त्यांचेच रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, म्हणून माझी सर्व वस्त्रे माखली.

  16. यशायाह ६३:४सुमारे इ.स.पू. ६९८

    माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते.

  17. यशायाह ६३:५सुमारे इ.स.पू. ६९८

    मी शोधले, परंतु तिथे साहाय्याला कोणीही नव्हते, कोणी मदतीला नसल्यामुळे मला धक्का बसला; तेव्हा माझ्या स्वतःच्या बाहूने माझ्याकरिता मी उद्धार मिळविला, आणि माझ्या स्वतःच्या क्रोधाने मला राखले.

  18. यशायाह ६३:६सुमारे इ.स.पू. ६९८

    क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले; माझ्या संतापाच्या भरात मी त्यांना मद्यधुंद केले आणि त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”

  19. यशायाह ६३:७सुमारे इ.स.पू. ६९८

    मी याहवेहच्या दयाळूपणाबद्दल त्यांनी केलेल्या सर्व स्तुतिपात्र कृत्यांबद्दल सांगेन, जे सर्व याहवेहनी आमच्यासाठी केले— होय, ज्या अनेक गोष्टी त्यांच्या करुणेने व विपुल दयेने, त्यांनी इस्राएलसाठी केल्या.

  20. यशायाह ६३:८सुमारे इ.स.पू. ६९८

    ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत, जी लेकरे माझ्याशी एकनिष्ठ राहतील;” म्हणून ते त्यांचे तारणकर्ता झाले.

  21. यशायाह ६३:९सुमारे इ.स.पू. ६९८

    त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.

  22. यशायाह ६३:१०सुमारे इ.स.पू. ६९८

    तरीही त्यांनी बंड केले व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला.

  23. यशायाह ६३:११सुमारे इ.स.पू. ६९८

    मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले, मोशे आणि त्यांच्या लोकांचे दिवस— ज्यांनी त्यांच्या मेंढपाळासह पूर्ण कळपाला समुद्रमार्गी बाहेर काढले, ते कुठे आहेत? त्यांच्यामध्ये आपला पवित्र आत्मा पाठविणारे ते कुठे आहेत?

  24. यशायाह ६३:१२सुमारे इ.स.पू. ६९८

    मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,

  25. यशायाह ६३:१३सुमारे इ.स.पू. ६९८

    समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले? उघड्या रानात असणार्‍या घोड्यांप्रमाणे, ते कधी अडखळले नाहीत;