circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ६३:१४सुमारे इ.स.पू. ६९८
जशी गुरे सपाटीवर जातात, तसे याहवेहच्या आत्म्याने त्यांना विसावा दिला. आपले नाव प्रतापी व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या लोकांचे मार्गदर्शन केले.
- यशायाह ६३:१५सुमारे इ.स.पू. ६९८
हे याहवेह, स्वर्गातून अवलोकन करा व पाहा, तुमच्या भव्य, पवित्र, गौरवी सिंहासनावरून खाली पाहा. तुमचा तो आवेश व तुमचे सामर्थ्य कुठे आहेत? तुमची आमच्यावरील कोमलता व करुणा आम्हाला देण्याचे तुम्ही आवरून धरले आहे.
- यशायाह ६३:१६सुमारे इ.स.पू. ६९८
परंतु तुम्हीच आमचे पिता आहात, जरी अब्राहाम आम्हाला ओळखत नाही इस्राएलने आम्हाला नाकारले आहे; तरी तुम्ही, हे याहवेह, आमचे पिता आहात, आमचे युगायुगांचे उद्धारकर्ता, हेच तुमचे नाव आहे.
- यशायाह ६३:१७सुमारे इ.स.पू. ६९८
हे याहवेह, तुम्ही आम्हाला तुमच्या मार्गावरून भटकून का जाऊ दिले? आणि आम्ही तुमचा सन्मान करणार नाही, अशी आमची अंतःकरणे कठीण का केली? जे वंशज तुमचे वारस आहेत, त्या तुमच्या सेवकांप्रीत्यर्थ परत या.
- यशायाह ६३:१८सुमारे इ.स.पू. ६९८
थोड्या काळाकरिता तुमच्या लोकांनी तुमच्या पवित्र भूमीचा ताबा घेतला, परंतु आता आमच्या शत्रूंनी तुमच्या पवित्रस्थानास तुडविले आहे.
- यशायाह ६३:१९सुमारे इ.स.पू. ६९८
तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहात; पण तुम्ही त्यांच्यावर राज्य केले नाही, ते तुमच्या नावाने संबोधले जात नाहीत.
- यशायाह ६४:१सुमारे इ.स.पू. ६९८
अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते!
- यशायाह ६४:२सुमारे इ.स.पू. ६९८
जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो, व ज्यामुळे पाणी उकळले जाते, तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील!
- यशायाह ६४:३सुमारे इ.स.पू. ६९८
जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास, तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले.
- यशायाह ६४:४सुमारे इ.स.पू. ६९८
प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही, कोणत्याही कानावर ते पडले नाही, कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो, जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात.
- यशायाह ६४:५सुमारे इ.स.पू. ६९८
जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही येता. परंतु जेव्हा आम्ही तुमच्याविरुद्ध सतत पाप करत राहिलो, तेव्हा तुमचा क्रोध आम्हावर भडकला. आता आमचा उद्धार कसा होणार?
- यशायाह ६४:६सुमारे इ.स.पू. ६९८
आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत. आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत; आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो, वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात.
- यशायाह ६४:७सुमारे इ.स.पू. ६९८
तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही किंवा तुमचा ध्यास घेत नाही; कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे.
- यशायाह ६४:८सुमारे इ.स.पू. ६९८
परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात. आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात; आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत.
- यशायाह ६४:९सुमारे इ.स.पू. ६९८
हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका; आमची पापे सदासर्वकाळ आठवू नका. हे याहवेह, आम्ही प्रार्थना करतो, आमच्यावर कृपादृष्टी करा, कारण आम्ही सर्व तुमचेच लोक आहोत.
- यशायाह ६४:१०सुमारे इ.स.पू. ६९८
तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत; सीयोनही ओसाड झाले आहे, यरुशलेम तर उजाड रान झाले आहे.
- यशायाह ६४:११सुमारे इ.स.पू. ६९८
जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली, ते आमचे पवित्र व वैभवी मंदिर बेचिराख झाले आहे, आणि आम्ही जोपासलेल्या सर्व वस्तूंची राखरांगोळी झाली आहे.
- यशायाह ६४:१२सुमारे इ.स.पू. ६९८
हे सर्व होऊनही याहवेह, आम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही स्वतःस रोखणार? तुम्ही स्तब्ध राहून आम्हाला प्रमाणाबाहेर शिक्षा करणार काय?
- यशायाह ६५:१सुमारे इ.स.पू. ६९८
“ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले; ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे. ज्या राष्ट्रांनी माझा धावा केला नाही त्यांना मी म्हटले, ‘पाहा मी इथे आहे, मी इथे आहे.’
- यशायाह ६५:२सुमारे इ.स.पू. ६९८
ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,
- यशायाह ६५:३सुमारे इ.स.पू. ६९८
हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात;
- यशायाह ६५:४सुमारे इ.स.पू. ६९८
जे कबरांच्या मध्ये जाऊन बसतात आणि गुप्तते मध्ये जागरण करण्यात रात्र घालवितात; जे डुकरांचे मांस खातात, आणि त्यांच्या भांड्यात निषिद्ध मांसाचा रस्सा असतो;
- यशायाह ६५:५सुमारे इ.स.पू. ६९८
जे म्हणतात, ‘दूर हो; माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे!’ असे लोक माझ्या नाकातील धूर आहेत, एक अग्नी, जो संपूर्ण दिवस जळत असतो.
- यशायाह ६५:६सुमारे इ.स.पू. ६९८
“पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”
- यशायाह ६५:७सुमारे इ.स.पू. ६९८
Your iniquities, and the iniquities of your fathers together, saith the LORD, which have burned incense upon the mountains, and blasphemed me upon the hills: therefore will I measure their former work into their bosom.