मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इब्री १३:१५सुमारे इ.स. ६४

    तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या.

  2. इब्री १३:१६सुमारे इ.स. ६४

    चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.

  3. इब्री १३:१७सुमारे इ.स. ६४

    आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.

  4. इब्री १३:१८सुमारे इ.स. ६४

    आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे.

  5. इब्री १३:१९सुमारे इ.स. ६४

    तुमच्याकडे मी लवकर परत यावे म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची विशेष गरज आहे.

  6. इब्री १३:२०सुमारे इ.स. ६४

    आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत,

  7. इब्री १३:२१सुमारे इ.स. ६४

    यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

  8. इब्री १३:२२सुमारे इ.स. ६४

    बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे.

  9. इब्री १३:२३सुमारे इ.स. ६४

    बंधू तीमथ्य हा आता तुरुंगातून सुटला आहे, हे तुम्हाला माहीत असावे, अशी माझी इच्छा आहे; तो इकडे लवकर आला, तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन.

  10. इब्री १३:२४सुमारे इ.स. ६४

    मंडळीतील तुमच्या सर्व वडीलजनांस व तेथील इतर पवित्र जणांना माझ्या शुभेच्छा सांगा. माझ्याबरोबर येथे इटलीमध्ये असलेले विश्वासणारे बांधव तुम्हाला शुभेच्छा सांगतात.

  11. इब्री १३:२५सुमारे इ.स. ६४

    तुम्हा सर्वांवर परमेश्वराची कृपा असो.

  12. याकोब १:१सुमारे इ.स. ६०

    परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून,

  13. याकोब १:२सुमारे इ.स. ६०

    माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना.

  14. याकोब १:३सुमारे इ.स. ६०

    कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो.

  15. याकोब १:४सुमारे इ.स. ६०

    धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये.

  16. याकोब १:५सुमारे इ.स. ६०

    जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात.

  17. याकोब १:६सुमारे इ.स. ६०

    परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्‍याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्‍या समुद्राच्या लाटेसारखा आहे.

  18. याकोब १:७सुमारे इ.स. ६०

    अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये.

  19. याकोब १:८सुमारे इ.स. ६०

    असा मनुष्य दुहेरी मनाचा असून ज्या सर्वगोष्टी तो करतो त्यात अस्थिर असतो.

  20. याकोब १:९सुमारे इ.स. ६०

    दीन परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा.

  21. याकोब १:१०सुमारे इ.स. ६०

    परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील.

  22. याकोब १:११सुमारे इ.स. ६०

    जसा सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.

  23. याकोब १:१२सुमारे इ.स. ६०

    जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, प्रभूने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना जो जीवनी मुकुट देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.

  24. याकोब १:१३सुमारे इ.स. ६०

    मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि ते स्वतः कोणाला मोहात पाडत नाहीत;

  25. याकोब १:१४सुमारे इ.स. ६०

    परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्याच दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो.