मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि या गोष्टीसंबंधात कोणीही आपल्या बंधू किंवा भगिनींचे अयोग्य करून गैरफायदा घेऊ नये. याबद्दल आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवले होते व इशारा दिला होता की असे पाप करणार्‍यांना प्रभू शिक्षा देतील.

  2. कारण येशू मरण पावले आणि पुन्हा जिवंत झाले, असा आपला विश्वास आहे, त्याअर्थी येशूंमध्ये झोपी गेले आहेत त्यांना परमेश्वर माघारी आणतील यावर आपण विश्वास ठेवतो.

  3. स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही.

  4. कारण प्रभू स्वतःच आज्ञा करणार्‍या मोठ्या ध्वनीने, प्रधान दूताच्या वाणीने आणि परमेश्वराच्या तुतारीच्या आवाजाने स्वर्गातून खाली उतरतील. मग ख्रिस्तामध्ये जे मरण पावले आहेत, ते प्रथम उठतील.

  5. त्यानंतर, जे आपण अजून जिवंत आहोत आणि मागे राहिलेले आहोत, असे सर्वजण मेघारूढ होऊन प्रभूला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ आणि प्रभूजवळ सदासर्वकाळ राहू.

  6. कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभूचा दिवस येईल.

  7. क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे.

  8. ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे.

  9. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांचा मान राखा.

  10. सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.

  11. परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत.

  12. ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत आणि ते करतीलच.

  13. हे पत्र सर्व बंधू आणि भगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हाला प्रभूसमोर आज्ञा करतो.

  14. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.

  15. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,

  16. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

  17. प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्‍या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील.

  18. जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील.

  19. सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील.

  20. त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना हर्षचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.

  21. हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाच्या प्रत्येक कृत्याच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो.

  22. प्रभू येशूंच्या नावाचे गौरव तुमच्यामध्ये आणि तुमचे त्यांच्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने व्हावे ही आमची प्रार्थना आहे.

  23. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुन्हा येणे व आपले त्यांच्याजवळ एकवटणे यासंबंधी बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगतो,

  24. आमच्याद्वारे दिलेल्या तथाकथित शिक्षणाद्वारे तुम्ही सहज अस्थिर किंवा गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, असे ठामपणे आपल्या संदेशाद्वारे किंवा बोलण्याद्वारे किंवा पत्राद्वारे सांगणार्‍यांना घाबरून जाऊ नका.

  25. मग हा अधर्मी पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील.