मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पहिल्या पुनरुत्थानात जे वाटेकरी होतात, ते धन्य आणि पवित्र आहेत, कारण दुसर्‍या मरणाची त्यांच्यावर सत्ता राहणार नाही. ते परमेश्वराचे व ख्रिस्ताचे याजक होऊन ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.

  2. मग एक भव्य शुभ्र राजासन व त्यावर बसलेला एकजण माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा पृथ्वी व आकाशांनी त्यांच्या समोरून पळ काढला आणि त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.

  3. जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.”

  4. ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्‍याचे पाणी मोफत देईन.

  5. जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील.

  6. मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्‍या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्‍याची पत्नी दाखवितो.”

  7. तेव्हा मी आत्म्याने संचारित झालो आणि मला एका उंच व विशाल अशा पर्वतशिखरावर नेण्यात आले. तिथून मी ती पवित्र नगरी म्हणजे यरुशलेम, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली.

  8. नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.

  9. नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते.

  10. नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे.

  11. मात्र त्या नगरीत कोणतीही अपवित्र गोष्ट, लज्जास्पद किंवा असत्य आचरण करणाऱ्यांचा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यांची नावे कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच या नगरीत प्रवेश करतील.

  12. मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती.

  13. तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील.

  14. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल.

  15. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.”

  16. “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.”

  17. “पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन.

  18. मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे.

  19. “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य.

  20. “तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”

  21. ज्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत, ते जाहीरपणे म्हणतात, “होय, मी लवकर येत आहे!” आमेन! हे प्रभू येशू, या!

  22. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराच्या लोकांवर असो. आमेन.