मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.

  2. ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!

  3. हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही? कारण तुम्हीच पवित्र आहात! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”

  4. मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात.

  5. कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.”

  6. नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.”

  7. नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली.

  8. मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो.

  9. ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”

  10. मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.

  11. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे, आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे.

  12. यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत!

  13. कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.”

  14. चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे.

  15. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.”

  16. तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्‍या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.”

  17. तेव्हा मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा व त्यावर जो बसला होता त्याचे नाव “विश्वासू आणि खरा” आहे. तो नीतीने न्याय आणि युद्ध करतो.

  18. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही.

  19. त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते.

  20. स्वर्गातील सैन्य उत्तम, तलम, पांढरी स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि पांढर्‍या घोड्यांवर स्वार होऊन त्यांच्यामागून चालत होते.

  21. “त्यांनी राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली.” ते त्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ परमेश्वराच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड ते तुडवतील.

  22. त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते: राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.

  23. तेव्हा तो पशू, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये, जो घोड्यावर बसला होता त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्र होत असलेले मी पाहिले.

  24. जो घोड्यावर बसलेला स्वार होता त्याच्या मुखातून बाहेर येणार्‍या तलवारीने बाकी राहिलेले मारले गेले आणि सगळ्या पक्षांनी आधाशीपणे त्यांचे मांस खाल्ले.

  25. नंतर ज्यांना न्याय करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यांना मी राजासनावर बसलेले पाहिले. आणि येशूंच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे आत्मे पहिले आणि त्यांनी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आपल्या कपाळावर व हातावर त्याची खूणही घेतली नव्हती. ते पुन्हा जिवंत झाले होते व त्यांनी ख्रिस्तासह एक हजार वर्षे राज्य केले.