James
James चा उल्लेख असलेली वचने
हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय?
त्या स्त्रियांमध्ये मरीया मग्दालिया; याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहानाची आई होती.
हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.
अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब व योसेफ यांची आई मरीया, सलोमी होत्या.
शब्बाथ संपल्यानंतर मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले.
ज्या स्त्रिया कबरेकडे गेल्या होत्या, त्यात मरीया मग्दालिया, योहान्ना, याकोबाची आई मरीया आणि इतर ज्या त्यांच्याबरोबर होत्या त्यांनी हे प्रेषितांना सांगितले.
पेत्राने त्यांना आपल्या हाताने खुणावून शांत केले आणि प्रभूने त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढले, हे त्यांना सविस्तर सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “याकोब आणि बंधू भगिनींना याबद्दल सांगा,” मग तो दुसर्या स्थळी निघून गेला.
मग त्यांचे बोलणे आटोपल्यावर याकोब म्हणाला, “बंधूंनो, माझे ऐका.
दुसर्या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते.
याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले.
प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्या प्रेषितांना मी भेटलो नाही.
जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.
याकोबाकडून काही लोक येण्यापूर्वी तो प्रथम गैरयहूदी लोकांबरोबर भोजन करीत असे. परंतु जेव्हा ते आले, तेव्हा त्याने मागे सरकण्यास सुरुवात केली आणि तो स्वतःला गैरयहूदीयांपासून वेगळे करू लागला, कारण सुंता झालेल्या गटातील लोकांचे त्याला भय वाटत होते.
परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून,
येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा बंधू यहूदाह याजकडून,