मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आणि निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, या सूचना कोणताही भेदभाव न करता पाळ. पक्षपाताने काहीही करण्यात येऊ नये.

  2. जे दास म्हणून जुवाखाली आहेत त्यांनी आपआपल्या धन्यास सर्व सन्मानास योग्य मानावे, यासाठी की परमेश्वराच्या नावाची आणि शिकवणीची निंदा होऊ नये.

  3. जर कोणी, इतर कोणतेही मत शिकवितो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य बोध आणि सुभक्तीचे शिक्षण मान्य करीत नाही,

  4. सर्वांना जीवन देणार्‍या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्‍या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो

  5. आपले प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत या आज्ञा दोषरहित आणि निर्दोष ठेव.

  6. परमेश्वर जे योग्य समयी त्याला पूर्ण करतील, परमेश्वर जे धन्यवादित व एकच सर्वसमर्थ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जे अगम्य प्रकाशात राहतात, ज्यांना कोणीही पाहिले नाही, आणि कोणीही पाहू शकत नाही; त्यांना सदासर्वकाळ गौरव आणि चिरकाल सामर्थ्य असो. आमेन.

  7. ख्रिस्त येशूंमधील जीवनाच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,

  8. माझा प्रिय पुत्र तीमथ्य यास:

  9. म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास आणि जो मी त्यांचा बंदिवान, त्या माझ्याविषयी तू लाज वाटून घेऊ नकोस, तर शुभवार्तेसाठी परमेश्वराच्या सामर्थ्याने तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.

  10. त्यांनीच आपले तारण केले आणि पवित्र जीवनासाठी आपल्याला पाचारण केले हे त्यांनी आपण काही केले म्हणून नव्हे, तर स्वतःच्या हेतूसाठी व कृपेमुळे केले. ही कृपा आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये युगाच्या पूर्वी दिलेली होती.

  11. तर आता आपला तारणारा ख्रिस्त येशूंच्या देखाव्याने प्रकट झाली आहे, ज्यांनी एकीकडे मृत्यूचा नाश केला आणि दुसरीकडे ईश्वरीय शुभवार्तेद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशित केले.

  12. याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे.

  13. जो चांगल्या शिक्षणाचा नमुना तू माझ्याकडून ऐकला, तो ख्रिस्त येशूंमधील विश्वास आणि प्रीती याबरोबर दृढ धरून राहा.

  14. अनेसिफर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर प्रभू दया करो, कारण त्याने अनेक वेळा मला उत्तेजन दिले आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची कधीच लाज वाटली नाही.

  15. त्या दिवशी प्रभूपासून त्याला दया मिळेल असे प्रभू करो! इफिसमध्ये त्याने मला किती प्रकारे मदत केली, हे तुला चांगले माहीत आहे.

  16. माझ्या मुला, ख्रिस्त येशूंच्या ठायी जी कृपा आहे, तिच्यात सबळ हो.

  17. येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल,

  18. जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो.

  19. येशू ख्रिस्त, जे दावीदाचे वंशज, मृतांतून उठविले गेले याची आठवण ठेव, हीच माझी शुभवार्ता.

  20. परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांना माझ्या दुःखसहनाकडून ख्रिस्त येशूंमध्ये तारण आणि सार्वकालिक गौरव मिळणार असेल, तर मी ती दुःखे आनंदाने सोशीन.

  21. ही बाब विश्वासयोग्य आहे की त्यांच्याबरोबर आपण मेलो तर त्यांच्याबरोबर जिवंतही राहू.

  22. जर आपण धीराने दुःख सहन करतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू, जर आपण त्यांना नाकारतो तर तेही आपल्याला नाकारतील.

  23. जर आपण अविश्वासी झालो, तरी ते विश्वासू राहतात, कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही.

  24. परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्‍यांचा नाश होतो.

  25. परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्‍यांनी अधर्मापासून दूर राहावे.”