मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे आणि त्याच्या मातृभूमीचा विध्वंस केला आहे.

  2. संगीत निर्देशकाकरिता. “गित्तीथ” वर आधारित. आसाफाची रचना. परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा; याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!

  3. इस्राएलसाठी हे विधी आहेत, हे याकोबाच्या परमेश्वराचे नियम आहेत.

  4. याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. सेला

  5. संगीत निर्देशकाकरिता. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे; याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे.

  6. याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.

  7. ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”

  8. राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.

  9. त्यांनी आपले मार्ग मोशेला प्रगट केले, आणि आपली अद्भुत कृत्ये इस्राएली लोकात केली:

  10. अहो त्यांचे सेवक, अब्राहामाच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, स्मरण करा.

  11. आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला:

  12. नंतर याकोब, म्हणजे इस्राएल इजिप्तमध्ये आला; आणि उपरा म्हणून हाम वंशजांच्या देशात राहिला.

  13. जेव्हा इस्राएल इजिप्तमधून, परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला,

  14. अगे पृथ्वी, तू परमेश्वराच्या समक्षतेत, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप.

  15. त्याने याहवेहची शपथ घेतली, याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला:

  16. जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”

  17. कारण याकोबाला आपलेसे करावे, इस्राएलला त्यांची मौल्यवान संपत्ती म्हणून याहवेहने त्यांना निवडले.

  18. तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,

  19. त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत.

  20. त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे, ते त्यांच्या सर्व नीतिमान भक्तांना, त्यांच्या अंतःकरणासमीप, त्यांना अत्यंत प्रिय अशा इस्राएली लोकांना स्तवन पात्र केले आहे. याहवेहचे स्तवन करा.

  21. अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  22. याकोबाच्या वंशजा ये, आपण याहवेहच्या प्रकाशात चालू.

  23. याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा तुमच्या लोकांचा त्याग केला आहे, ते पूर्वेकडील अंधश्रद्धेने भरून गेलेले आहेत; पलिष्टी लोकांप्रमाणे ते दुरात्म्यांशी संपर्क साधतात आणि मूर्तिपूजकांच्या रूढी त्यांनी स्वीकारल्या आहेत.

  24. मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन.

  25. प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे; तो इस्राएलवर पडेल.