मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते.

  2. तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.”

  3. जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी पाहिले की, अग्नी खाली उतरत आहे आणि याहवेहचे गौरव मंदिराच्या वर आहे तेव्हा त्यांनी पदपथावर गुडघे टेकून त्यांची मुखे जमिनीकडे केली आणि आराधना केली आणि याहवेहना असे म्हणत धन्यवाद दिला, “ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.”

  4. शलोमोनाने त्याला हीरामकडून मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली.

  5. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे.

  6. परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.

  7. परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.

  8. हदोराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

  9. परमेश्वर आम्हाबरोबर आहेत; ते आमचे नेतृत्व करतात. त्यांचे याजक तुझ्याविरुद्ध युद्धाचे रणशिंग वाजवितील. इस्राएलच्या लोकांनो, तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह, यांच्याविरुद्ध लढाई करू नका, कारण तुम्ही यशस्वी होणार नाही.”

  10. इस्राएली लोक यहूदीयांसमोरून पळून गेले आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या हाती दिले.

  11. त्या प्रसंगी इस्राएल लोकांचा पराभव झाला आणि यहूदीयाचे लोक विजयी झाले, कारण ते याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर यांच्यावर विसंबून राहिले होते.

  12. त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.

  13. इस्राएली लोकांनी यहूदीया येथून आलेल्या त्यांच्या बंधूइस्राएली लोकांमधून दोन लाख स्त्रिया, पुत्र आणि कन्यांना कैद केले. त्यांनी पुष्कळ लूट घेतली व ती शोमरोनला नेली.

  14. राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्‍यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील.

  15. यरुशलेममध्ये जे इस्राएली लोक उपस्थित होते, त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस मोठ्या आनंदात साजरा केला, तर लेवीय लोकांनी आणि याजकांनी याहवेहना समर्पित केलेल्या प्रतिध्वनीच्या वाद्यांसहित दररोज याहवेहची स्तुती केली.

  16. जेव्हा हे सर्व समाप्त झाले, तेव्हा तिथे असलेले इस्राएली लोक बाहेर पडून यहूदीयाच्या नगरांमध्ये गेले व त्यांनी पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्यांनी यहूदीया, बिन्यामीन आणि एफ्राईम व मनश्शेह येथील उच्च स्थाने आणि वेद्या नष्ट केल्या. त्यांनी ते सर्व नष्ट केल्यानंतर, इस्राएली लोक स्वतःच्या गावी आणि स्वतःच्या वतनाकडे परत आले.

  17. आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला.

  18. यहूदीयाच्या गावांमध्ये राहणाऱ्या इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांनीसुद्धा त्यांची गुरे आणि कळप यांचा दशांश आणि त्यांचा परमेश्वर याहवेहना समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशांश आणला आणि त्याचा ढीग रचला.

  19. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले.

  20. परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.

  21. योशीयाहने इस्राएली लोकांच्या सर्व प्रदेशामधून सर्व घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या आणि इस्राएलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करावयास लावले. जोपर्यंत तो जिवंत होता, तोपर्यंत त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे अनुसरण करण्यास ते चुकले नाहीत.

  22. त्यावेळी जे इस्राएली लोक तिथे उपस्थित होते त्यांनी वल्हांडण सण साजरा केला आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस पाळला.

  23. यहूदीयाला परतलेले सर्व इस्राएली लोक आपआपल्या शहरात स्थायिक झाल्यावर ते सातव्या महिन्यात यरुशलेममध्ये एकत्र आले.

  24. याजकांनी, लेव्यांनी व सर्व इस्राएली लोकांनी अत्यंत हर्षाने मंदिराचा समर्पणविधी साजरा केला.

  25. बंदिवासातून परत आलेल्या यहूदी आणि यहूदीयात वस्ती करून राहिलेले इस्राएली लोक मूर्तिपूजक परकीय लोकांच्या अशुद्ध चालीरीतींना सोडून, याहवेह परमेश्वराच्या भक्तीमध्ये सामील झाले.