मुख्य मजकुरावर जा

Benjamin

157 वचने · 26 कुटुंब सदस्य

Benjamin चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला.

  2. बिन्यामीन वंशातील एक मनुष्य होता, त्याचे नाव कीश होते, तो अबीएलचा पुत्र होता, तो सरोराचा पुत्र, तो बेकोराथचा पुत्र, तो अफियाचा पुत्र होता. तो बिन्यामीन घराण्यातील असून सन्माननीय मनुष्य होता.

  3. “याच वेळेस उद्या मी तुझ्याकडे बिन्यामीनच्या प्रदेशातील एक मनुष्य पाठवेन. माझ्या इस्राएली लोकांवर शासनकर्ता म्हणून त्याचा अभिषेक कर; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवेल. मी माझ्या लोकांकडे पाहिले आहे, कारण त्यांचा आकांत माझ्यापर्यंत पोहोचला आहे.”

  4. शौलाने उत्तर दिले, “परंतु मी बिन्यामीन गोत्र जे इस्राएलचे सर्वात लहान, त्यातील नाही काय आणि माझे कूळ बिन्यामीनच्या गोत्रातील सर्वात लहान कूळ नाही काय? तर मग तुम्ही मला असे का बोलत आहात?”

  5. आज तू माझ्याकडून गेल्यावर, बिन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्सेह येथे राहेलच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील. ते तुला सांगतील, ‘ज्या गाढवांच्या शोधात तू बाहेर पडला होता ती सापडली आहेत आणि आता तुझ्या वडिलांनी त्यांच्याबद्दलचा विचार करण्याचे थांबविले आहे आणि तुझ्याबद्दल काळजी करीत आहेत. ते म्हणत आहेत मी, “माझ्या मुलाविषयी काय करावे?” ’

  6. जेव्हा शमुवेलने सर्व इस्राएलला त्यांच्या गोत्राप्रमाणे पुढे आणले, बिन्यामीन गोत्राची चिठ्ठी निघाली.

  7. नंतर त्याने बिन्यामीन गोत्राला कुळानुसार पुढे आणले आणि मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली. शेवटी कीशाचा पुत्र शौल याची निवड झाली. परंतु जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला, तेव्हा तो कुठेच सापडला नाही.

  8. शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.

  9. नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.

  10. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि त्यांच्याबरोबर असलेले पुरुष बिन्यामीन प्रांतामध्ये गेबा येथे राहिले. आणि पलिष्टी लोकांनी मिकमाश येथे तळ दिला.

  11. इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे.

  12. त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

  13. म्हणून ते उभे राहिले आणि त्यांची मोजणी करण्यात आली; बिन्यामीन आणि शौलाचा पुत्र इश-बोशेथ यांच्यातील बारा माणसे आणि बारा माणसे दावीदासाठी पुढे आले.

  14. तेव्हा बिन्यामीनचे लोक अबनेरच्या मागे गेले. त्यांनी आपला एक गट तयार केला आणि एका टेकडीच्या शिखरावर उभे राहिले.

  15. परंतु दावीदाच्या माणसांनी अबनेर बरोबर असलेल्या तीनशे साठ बिन्यामीन लोकांना मारले होते.

  16. अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले.

  17. इकडे शौलाच्या पुत्राकडे दोन माणसे होती, ते छापा घालणाऱ्या तुकड्यांचे पुढारी होते. एकाचे नाव बाअनाह आणि दुसऱ्याचे रेखाब असे होते; ते बिन्यामीन गोत्रातील, बैरोथ वंशाच्या रिम्मोनचे पुत्र होते, बैरोथ हा बिन्यामीनचा भाग समजला जातो,

  18. त्याच्याबरोबर बिन्यामीन कुळातील एक हजार माणसे होती, त्याचप्रमाणे शौलाच्या घराचा कारभारी सीबा आणि त्याचे पंधरा पुत्र आणि वीस सेवक हे त्याच्याबरोबर होते. यार्देनेकडे जिथे राजा होता तिथे ते घाईने गेले.

  19. त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.

  20. नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेब, गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तई,

  21. एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर.

  22. जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.

  23. “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग,

  24. मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.

  25. दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर.