मुख्य मजकुरावर जा

Benjamin

157 वचने · 26 कुटुंब सदस्य

Benjamin चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह.

  2. त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली.

  3. बिन्यामीनचे तीन पुत्र: बेला, बेकेर व यदिएल.

  4. बिन्यामीनच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठपुत्र बेला, दुसरा आशबेल, तिसरा अहरह,

  5. ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते.

  6. यहूदाह, बिन्यामीन, एफ्राईम व मनश्शेह यांच्यापैकी जे यरुशलेममध्ये राहण्यास आले:

  7. बिन्यामीन वंशातून: सल्लू जो मशुल्लामाचा पुत्र, जो होदव्याहचा पुत्र व जो हस्सनुआहाचा पुत्र;

  8. गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तय, पिराथोनचा बेनाइयाह,

  9. हे सर्वच धनुर्धारी वीर असून आपल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्‍यबाण मारण्यात प्रवीण होते. ते सर्वच बिन्यामीन गोत्रातील आणि शौल राजाचे नातलग होते):

  10. बिन्यामीन व यहूदाह गोत्रातील दुसरे काहीजण दावीदाकडे गडावर आले.

  11. बिन्यामीनच्या म्हणजे शौलाच्या गोत्रातील 3,000, यातील बहुतेक या वेळेपर्यंत शौलाशा एकनिष्ठ राहिले होते;

  12. या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता.

  13. गिलआदातील मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: जखर्‍याहचा पुत्र इद्दो; बिन्यामीन गोत्रावर: अबनेरचा पुत्र यासीएल;

  14. जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करणारे आणि रेहोबोअमला राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.

  15. “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअमला व यहूदीयातील सर्व इस्राएली व बिन्यामीनच्या लोकांना सांग,

  16. सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती.

  17. त्याने तेथील प्रत्येक नगरात ढाली आणि भाले ठेवले आणि त्यांना फारच सामर्थ्यवान केले. म्हणून यहूदीया आणि बिन्यामीन त्याच्याकडेच राहिले.

  18. तो फार हुशारीने वागला आणि त्याच्या काही मुलांना यहूदीया आणि बिन्यामीन प्रांतात आणि सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये पांगविले. त्याने त्यांना विपुल पुरवठा दिला आणि त्यांच्यासाठी अनेक पत्नी केल्या.

  19. आसाकडे यहूदीयाचे तीन लाख योद्ध्यांचे सैन्य, मोठ्या ढाली आणि भाले घेऊन सुसज्ज होते आणि बिन्यामीन येथील दोन लाख ऐंशी हजार योद्ध्यांचे सैन्य, लहान ढाली आणि धनुष्य घेऊन सुसज्ज होते. हे सर्व शूर लढवय्ये पुरुष होते.

  20. तो आसाला भेटण्यासाठी गेला आणि त्याला म्हणाला, “आसा आणि सर्व यहूदाह व बिन्यामीन माझे ऐका, याहवेह तुमच्याबरोबर आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर राहाल. जर तुम्ही त्यांचा शोध घ्याल, तर ते तुम्हाला सापडतील, परंतु जर तुम्ही त्यांना सोडाल, तर ते तुम्हाला सोडतील.

  21. जेव्हा आसाने हे शब्द आणि ओदेद संदेष्ट्याचा पुत्र अजऱ्याहची भविष्यवाणी ऐकली तेव्हा त्याला धीर आला. त्याने यहूदाह आणि बिन्यामीनच्या संपूर्ण देशातील आणि त्याने ताब्यात घेतलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गावांमधील अमंगळ मूर्ती काढून टाकल्या. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशमंडपासमोर याहवेहची जी वेदी होती, तिची दुरुस्ती केली.

  22. नंतर त्याने सर्व यहूदीया आणि बिन्यामीन आणि एफ्राईम, मनश्शेह आणि शिमओन येथील लोकांना जमविले, जे त्यांच्यामध्ये स्थायिक झाले होते, कारण त्याचे परमेश्वर याहवेह त्याच्याबरोबर आहेत हे पाहून इस्राएलमधून मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आले होते.

  23. बिन्यामीनकडून: एलयादा, हा शूर सैनिक, त्याच्याबरोबर धनुष्‍यबाण आणि ढाल घेऊन सज्ज असलेले 2,00,000 पुरुष;

  24. अमस्याहने यहूदीयाच्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सर्व यहूदाह आणि बिन्यामीनसाठी त्यांच्या कुटुंबांप्रमाणे हजारोंचे सेनापती आणि शंभराचे सेनापती नियुक्त केले. त्यानंतर त्याने वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकत्र केले आणि त्याला असे दिसून आले की लष्कराच्या सेवेसाठी योग्य असे तीन लाख पुरुष आहेत, भाला आणि ढाल हाताळण्यास ते सक्षम आहेत.

  25. जेव्हा हे सर्व समाप्त झाले, तेव्हा तिथे असलेले इस्राएली लोक बाहेर पडून यहूदीयाच्या नगरांमध्ये गेले व त्यांनी पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्यांनी यहूदीया, बिन्यामीन आणि एफ्राईम व मनश्शेह येथील उच्च स्थाने आणि वेद्या नष्ट केल्या. त्यांनी ते सर्व नष्ट केल्यानंतर, इस्राएली लोक स्वतःच्या गावी आणि स्वतःच्या वतनाकडे परत आले.